उशिराने का होईना; अखेर मानधन खात्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:52 AM2019-01-31T00:52:48+5:302019-01-31T00:53:50+5:30

मागील अनेक महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांचे मानधन रखडले होते. अखेर उशिराने का होईना सात महिन्यांचे मानधन मदतनिसांना वाटप करण्यात आले आहे. मानधन रखडल्याबाबत लोकमत ने वारंवार वृत्त प्रकाशित केले होते.

To be late; Finally, deposited in the Monnotherapy account | उशिराने का होईना; अखेर मानधन खात्यात जमा

उशिराने का होईना; अखेर मानधन खात्यात जमा

Next
ठळक मुद्देलोकमत इफेक्ट: स्वयंपाकी मदतनिसांना मिळत नसल्याने केला होता पाठपुरावा

हिंगोली : मागील अनेक महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांचे मानधन रखडले होते. अखेर उशिराने का होईना सात महिन्यांचे मानधन मदतनिसांना वाटप करण्यात आले आहे. मानधन रखडल्याबाबत लोकमत ने वारंवार वृत्त प्रकाशित केले होते.
जिल्हा परिषदेच्या जवळपास १ हजार शाळांमधून दीड लाखाच्या वर पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. सकस आहारापासून विद्यार्थी वंचित राहू नये, याची शासनाकडून खबरदारी घेण्याच्या सूचनाही शिक्षण विभागास आहेत. जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाºया मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ चे मानधन बाकी आहे. शिवाय दोन महिन्याचे इंधन व भाजीपाल्याची रक्कम मात्र मिळाली नाही. मागील अनेक महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने मात्र मदतनिसांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. स्वयंपाकी मदतनिसांना मानधन मिळत नसल्याचे वृत्त वारंवार लोकमतने प्रकाशित केले. त्यामुळे उशिराने का होईना याबाबत शासनाकडून दखल घेत सात महिन्यांचे मानधन मदनिसांना वाटप केले आहे. मदतनिसांचे मानधन संदर्भात बँकीतील अधिकारी व कर्मचा-यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर मानधनाची रक्कम मदतनिसांना वाटप केल्याचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी सांगितले. मदतनिसांना मानधन देण्यात यावे, यासाठी महाराष्ट राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सुभाष जिरवणकर यांनी वेळोवेळी शिक्षणाधिकारी व जि. प. प्रशासनास निवेदन सादर केले होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. योजना प्रभावीपणे राबविण्याच्या शासनाच्या सूचना आहेत, शिवाय या योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. परंतु शासनाची ही महत्त्वपूर्ण योजना प्रभावीपणे राबविली जात नाही. कधी शाळेत तांदुळाचा पुरवठा वेळेत होत नाही, तर कधी धान्यादी मालच नसतो. तर कधी इंधन भाजीपाल्याचा खर्च दिला जात नाही. त्यात स्वयंपाकी मदतनिसांनाच्या मानधनाचा प्रश्न हा गंभीर आहे. वेळेत मानधन देण्याची मागणी मदतनिसांतून केली जाते.

Web Title: To be late; Finally, deposited in the Monnotherapy account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.