प्रतिकूल शाळांची यादी दोन दिवसांत जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:28 AM2018-02-23T00:28:41+5:302018-02-23T00:28:45+5:30

जिल्हांतर्गत बदली संदर्भात पात्र शिक्षकांच्या याद्या, महिलांसाठी प्रतिकूल शाळांची यादी दोन दिवसांत जाहीर करण्याचे परिपत्रक ग्रामविकास विभागाजे अवर सचिवांनी २१ रोजी काढले आहे.

 Announce the list of adverse schools in two days | प्रतिकूल शाळांची यादी दोन दिवसांत जाहीर करा

प्रतिकूल शाळांची यादी दोन दिवसांत जाहीर करा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : जिल्हांतर्गत बदली संदर्भात पात्र शिक्षकांच्या याद्या, महिलांसाठी प्रतिकूल शाळांची यादी दोन दिवसांत जाहीर करण्याचे परिपत्रक ग्रामविकास विभागाजे अवर सचिवांनी २१ रोजी काढले आहे.
राज्यातील जि.प. शिक्षकांची जिल्हांतर्गत संगणकीय आॅनलाईन बदली प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे बदलीपात्र शिक्षक व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या तत्काळ जाहीर करा, महिला शिक्षकांना काम करण्यास प्रतिकूल अशा शाळांची यादी घोषित करावी, दुर्गम भागात महिला शिक्षिका कार्यरत असतील तर अशा महिला शिक्षकांची नावे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या यादीमध्ये घोषित करण्यात याव्यात, अनिवार्य रिक्त ठेवायच्या पदांची विषयनिहाय यादी घोषित करावी, अनिवार्य रिक्त पदावर कार्यरत पदवीधर शिक्षक असल्यास त्यांची विषयनिहाय यादी तयार करणे आदीबाबतच्या सूचना ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिल्या आहेत. दोन दिवसांत ही कार्यवाही करण्याचेही आदेशित करण्यात आले आहे.

Web Title:  Announce the list of adverse schools in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.