पुन्हा अतिक्रमण हटाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:40 AM2018-06-20T00:40:22+5:302018-06-20T00:40:22+5:30

शहरात पुन्हा यावर्षी अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. हरण चौक, इंदिरा गांधी चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली आहे. पुढील टप्प्यात रहदारीला त्रासदायक ठरणारी इतरही रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.

 Again, remove encroachment | पुन्हा अतिक्रमण हटाव

पुन्हा अतिक्रमण हटाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरात पुन्हा यावर्षी अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. हरण चौक, इंदिरा गांधी चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आदी भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली आहे. पुढील टप्प्यात रहदारीला त्रासदायक ठरणारी इतरही रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सांगितले.
हिंगोली शहरात दरवर्षीच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येते. मात्र काही दिवसांनी पुन्हा अतिक्रमणे ‘जैसे थे’ होत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनानेही वाहतुकीला त्रासदायक ठरणारी ही अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याची तयारी दाखविली होती. त्याचबरोबर बांधकाम विभागाने अग्रसेन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावरील अतिक्रमणे काढून घेण्यास सांगितले होते. ती पोलीस बंदोबस्तात काढून घेण्यात आली आहेत. त्याचवेळी शहरातही ही मोहीम राबविली जाणार असल्याचे संकेत मिळत होते. मात्र मध्यंतरी प्रशासनाची अडचण व सणाच्या पार्श्वभूमिवर त्याला मुदतवाढ दिली होती. आज सकाळपासूनच हरण चौक, इंदिरा गांधी चौक ते डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंतची अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. अनेकांनी गतवर्षी तोडलेल्या छपऱ्या, टपºया, फूटपाथवरील ओटे, पायºया पुन्हा बनविल्याचे पहायला मिळाले. त्यावर पुन्हा एकदा जेसीबी चालविण्यात आला आहे. अतिक्रमणधारक वारंवार या बाबींवर खर्च करीत असले तरीही प्रशासनही तेवढीच सक्षमपणे कारवाई करीत आहे.
ही मोहीम टप्प्या-टप्प्याने शहरातील इतर भागातही राबविली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे दुकानदारांनी स्वत: काढून घेण्याचे आवाहन मुख्याधिकाºयांनी केले. गांधी चौक, जवाहर रोड, भाजीमंडई यासह इतर भागातील अतिक्रमणेही हटविली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या मोहिमेमुळे यापुढे तरी कोणी अतिक्रमण करण्यास धजावणार नाही, अशी आशा आहे.
सध्या भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे अतिक्रमणे केलेल्या ठिकाणी वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अनेकजण ही मोहीम अंतर्गत भागात राबविण्याची अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

Web Title:  Again, remove encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.