३ लाख पोत्यांचा हिशेब लागेना...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:02 AM2018-06-22T01:02:43+5:302018-06-22T01:02:43+5:30

शालेय पोषण आहाराच्या रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने मागितला नव्हे, तर रक्कम जमा करण्यासाठी सांगितले आहे. त्यावरून मोठा गहजब होत आहे. यातून हिंगोली जिल्ह्यात जेमतेम ७ लाख रुपये मिळतील. मात्र गोंधळ जणू कोट्यवधींची रक्कम जमा करायची असल्यासारखा होत आहे.

 3 lakh bags were not counted ...! | ३ लाख पोत्यांचा हिशेब लागेना...!

३ लाख पोत्यांचा हिशेब लागेना...!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शालेय पोषण आहाराच्या रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने मागितला नव्हे, तर रक्कम जमा करण्यासाठी सांगितले आहे. त्यावरून मोठा गहजब होत आहे. यातून हिंगोली जिल्ह्यात जेमतेम ७ लाख रुपये मिळतील. मात्र गोंधळ जणू कोट्यवधींची रक्कम जमा करायची असल्यासारखा होत आहे.
हिंगोली जिल्ह्यात खाजगी, जि.प. शाळांमधून पोषण आहार वितरण होते. २0१७-१८ या आर्थिक वर्षात २८ हजार ८00 क्ंिवटल तांदूळ लागला होता. ५0 किलोचे एक पोते असते. त्यामुळे ५७ हजार ६00 पोत्यांचा या एका वर्षाचा हिशेब द्यावा लागेल. त्यापूर्वीच्या पाच वर्षांचा सरासरी ५0 हजारांप्रमाणे हिशेब लावला तर सहाही वर्षांचे ३ लाख पोते होतात. ते दोन ते अडीच रुपये किमतीत लिलावात विकायचे आहेत. यावरून जेमतेम ६ ते ७.५ लाखांची रक्कम जमा होणार आहे. मात्र एवढ्या रकमेसाठी अख्खा जिल्हाच हैराण झाल्याचे वातावरण तयार झाले आहे. मुख्याध्यापक, शिक्षक पोते शोधत आहेत. जिल्ह्यात शाळांची संख्या अन् पोत्यांची रक्कम पाहता मोठ्या शाळांनाच याची डोकेदुखी होऊ शकते. लहान शाळांमध्ये तर लिलाव न करताच खिशातून रक्कम भरण्याची वेळ मुख्याध्यापकांवर येऊ शकते. इतकी रक्कम कमी राहणार आहे.
शासनाने २०१२-१३ ते २०१७-१८ या वर्षातील पोत्यांची माहिती मागविली आहे. त्यामुळे आता शिक्षण खात्याला धान्यादी पोत्यांचा हिशोब लावून जमा झालेली रक्कम शासनाच्या खात्यावर चलनद्वारे जमा करावी लागणार आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या तरी अहवाल कधी सादर होईल,
हे सांगणे कठीण आहे. गटशिक्षणाधिकारी अजूनही हे अहवाल तयारच करीत आहेत. मात्र काही तालुक्यात पोते जमा करण्यास सुरूवात झाली आहे. तर काही तालुक्यात अद्याप पोते जमा करण्यास सुरूवातच झाली नाही.
संबंंधित मुख्याध्यापक व शिक्षकांनी पोत्यांचा लिलाव करावा. सदर रक्कम शासनाच्या खात्यावर जमा करावी. तसा अहवालही सादर करावा, अशा सूचना शिक्षणाधिकाºयांनी गशिअ यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील शाळांत शालेय पोषण आहार
४जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ३२ शाळांतून शालेय पोषण आहार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जातो. आता या शाळांत पुरवठा केलेल्या तांदूळ व धान्यादी मालाचे पोते जमा करण्याची वेळ आली आहे.

 

Web Title:  3 lakh bags were not counted ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.