संधिवाताच्या दुखण्यावर गुणकारी ठरतो टोमॅटो; असा करा उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 12:46 PM2019-04-08T12:46:16+5:302019-04-08T12:50:17+5:30

संधिवात किंवा आर्थराइटिसच्या विळख्यात भारतच नाही तर जगभरातील अनेक लोक आले आहेत. भारतामध्ये प्रत्येक दुसरी आणि तिसरी व्यक्ती गुडघेदुखीने हैराण आहे.

Tomato is very helpful in arthritis problem | संधिवाताच्या दुखण्यावर गुणकारी ठरतो टोमॅटो; असा करा उपचार

संधिवाताच्या दुखण्यावर गुणकारी ठरतो टोमॅटो; असा करा उपचार

Next

संधिवात किंवा आर्थराइटिसच्या विळख्यात भारतच नाही तर जगभरातील अनेक लोक आले आहेत. भारतामध्ये प्रत्येक दुसरी आणि तिसरी व्यक्ती गुडघेदुखीने हैराण आहे. तज्ज्ञांच्या मते, देशातील 15 कोटीपेक्षा अधिक लोक गुडघ्यांच्या दुखण्याने त्रस्त आहेत. ज्या वेगाने हा आजार वाढत आहे, येणाऱ्या काही वर्षांमध्ये आर्थरायटिस लोकांना शारीरिकरित्या कमजोर करणारं चौथं प्रमुख कारण होणार आहे. जसजसा हा रोग वाढतो, तसंतसा चालणंही कठिण होत जातं. संधिवाताचा सर्वात मोठा  परिणाम गुडघ्यांवर आणि पाठिच्या मणक्यावर होतो. याचबरोबर हाताच्या बोटांचे सांधे, पायांचे सांधे यांवर परिणाम होतो. भारतीय लोकांना अनुवांशिकरित्या गुडघे आणि आर्थरायटिसने ग्रस्त होतात. संधिवाताने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी टॉमेटो फार फायदेशीर ठरतो. 

टॉमेटो ठरतो फायदेशीर :

आपल्या स्वयंपाक घरात टॉमेटोचं फर महत्त्व आहे. कारण जवळपास सर्व पदार्थांमध्ये टॉमेटोचा वापर करण्यात येतो. टॉमेटोची प्युरी किंवा बारिक चिरून टॉमेटोचा वापर करण्यात येतो. याव्यतिरिक्त टॉमेटोचा उपयोग सलाड, सूप तयार करण्यासाठी आणि चटनीमध्ये करण्यात येतो. त्याचबरोबर संधिवातामध्येही टॉमेटो गुणकारी ठरतो. दररोज टॉमेटोच्या ज्यूसमध्ये ओवा एकत्र करून खाल्याने संधिवाताच्या समस्येपासूव सुटका होते. टॉमेटोमध्ये व्हिटॅमिन सी, लायकोपीन, व्हिटॅमिन, पोटॅशिअम आढळून येतं, जे शरीरासाठी अत्यंत फादेशीर ठरतं. 

टॉमेटोचे इतर फायदे :

1. अतिसार, पोटाच्या समस्या आणि लठ्ठपणा रोखण्यासाठी टॉमेटो मदत करतो. 
2. भाजीची चव वाढविण्यासाठीही टॉमेटो मदत करतो. 
3. टॉमेटो खाल्याने बद्धकोष्ट, शरीरामध्ये झालेल्या रक्ताच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. 
4. मधुमेह, खोकला, दातांच्या समस्या इत्यादींमध्ये टॉमेटोच्या सेवनाने आराम मिळतो. 

काय आहे संधिवात?

जेव्हा सांध्यांमधील यूरिक अॅसिड कमी होतं, तेव्हा संधिवाताचा त्रास सुरू होतो. त्यानंतर व्यक्तीला एक किंवा एकापेक्षा अधिक सांधेदुखी आणि सूज येते. संधिवाताची समस्या आणखी वाढल्याने व्यक्तीला चलताना-फिरताना त्रास होतो. यूरिक अॅसिड अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ खाल्याने तयार होतं. 

टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Tomato is very helpful in arthritis problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.