घोरण्याचा आवाजापासून मिळणार सुटका, संशोधकांनी तयार केली 'ही' स्मार्ट उशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 10:47 AM2019-02-01T10:47:19+5:302019-02-01T10:48:30+5:30

झोपेत घोरण्याची सवय ही त्या व्यक्तीसोबत इतरांसाठीही त्रासदायक असते. घोरण्याची सवय असणारा व्यक्ती तर शांत झोपतो पण आजूबाजूच्यांना मात्र रात्रभर झोप लागत नाही.

Researchers develop AI based smart pillow block out partners snoring on bed | घोरण्याचा आवाजापासून मिळणार सुटका, संशोधकांनी तयार केली 'ही' स्मार्ट उशी!

घोरण्याचा आवाजापासून मिळणार सुटका, संशोधकांनी तयार केली 'ही' स्मार्ट उशी!

Next

झोपेत घोरण्याची सवय ही त्या व्यक्तीसोबत इतरांसाठीही त्रासदायक असते. घोरण्याची सवय असणारा व्यक्ती तर शांत झोपतो पण आजूबाजूच्यांना मात्र रात्रभर झोप लागत नाही. त्यामुळे आतापर्यंत यावर घरगुती उपायट केले जात होते. मात्र या उपायांनी तसा फारसा फरक बघायला मिळत नाही. एका संशोधनानुसार या व्यायामामुळे घोरण्याचे प्रमाण  36% कमी होते तर 59 % घोरण्याचा आवाज कमी होतो. पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात आहे ही समस्या अधिक वाढते. पण आता यावर संशोधकांनी एक चांगला उपाय शोधून काढला आहे. 

अमेरिकेच्या संशोधकांनी एक अशी स्मार्ट उशी तयार केली आहे ज्यामुशे तुमचं घोरणं बंद होऊन इतरांना आणि तुम्हाला शांत झोप येण्यास मदत करेल. या उशीची खासियत ही आहे की, या उशीतून निघणारे सिग्नल्स घोरण्याच्या आवाजाला तुमच्या कानापर्यंत पोहोचूच देत नाहीत. याचा अर्थ हा आहे की, घोरणारा व्यक्ती आरामात झोपू शकतो आणि त्याच्या बाजूला झोपणाऱ्याचीही झोप खराब होत नाही. नॉर्थन इलिनोइस यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी ही उशी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केली आहे. 

घोरण्याचा आवाज दाबते फशी

संशोधकांनुसार, ही उशी आवाज कमी करणाऱ्या(नॉइस कॅंसिलेशन) तंत्रावर काम करते. या स्मार्ट उशीमध्ये करण्यात आलेल्या एका प्रोग्रॅमिंगने घोरण्याचा आवाज शांत केला जातो. नॉइस कॅंसिलेशन तंत्र आधी घोरण्याच्या आवाजाच्या तीव्रतेची माहिती घेतं. त्यानंतर त्या समान तीव्रता असणारे तरंग उत्पन्न करून घोरण्याचा आवाज दाबते. 

मायक्रोफोन ओळखणार घोरण्याची तीव्रता

घोरण्याची तीव्रता आणि फ्रिक्वेंसीची माहिती घेण्यासाठी या स्मार्ट उशीमध्ये तीन मायक्रोफोन लावण्यात येतील. हे घोरण्याचा आवाज कॅप्चर करतील. त्यानंतर हे आवाज एका फिल्टरमध्ये जातील. इथे घोरण्याच्या तीव्रतेच्या समान अॅंटी-नॉइज सिग्नल रिलीज केले जातील. जेव्हा दोन विरूद्ध सिग्नल मिळतील तेव्हा बाहेरचा आवाज शांत होईल. 

किती डेसिबल आवाज कमी केला जाऊ शकतो?

याआधीही संशोधकांनी घोरण्याच्या आवाजापासून सुटका मिळवण्यासाठी नॉइज कॅंसिलेशन तंत्राचे हेडबोर्ड आणि ब्लॅंकेट तयार केले होते. पण हे तितके फायदेशीर ठरले नाहीत. पण आता त्यांनी सांगितले की, उशीममुळे ब्लॅंकेट आणि हेडबोर्डपेक्षाही जास्त प्रभावी फायदा होऊ शकतो. टेक्टिंगदरम्यान संशोधकांना आढळलं की, उशी ३० ते ३१ डेसिबल पर्यंतचा आवाज कमी करण्यास सक्षम आहे. 

या व्यायामानेही कमी करा घोरणे

1. घोरणार्‍या व्यक्तीने, टाळूच्या विरुद्ध दिशेला जीभेचे टोक मागे वळवण्याचा प्रयत्न करावा.

2. जीभ टाळूवर घासून खालच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न करा.

3.घोरण्याच्या समस्येनी पीडित लोकांनी जीभेच्या पुढच्या टोकाला टाळूच्या दिशेनं दाबावं त्यानंतर जीभेला पुन्हा खेचून घ्यावं. आता जीभेच्या पुढच्या बाजूने दातांना स्पर्श करत जीभेच्या मागील भागास टाळूच्या दिशेला दाबावे आणि ‘ए’ उच्चार करावा.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ केंटुकी कॉलेज ऑफ मेडिसिनचे मेडीकल डिरेक्टर बारबार फिलीप्स यांच्यानुसार, घोरण्याच्या समस्येसंबंधी अनेक लोकांना दिलासा देण्यासाठी हे संशोधन उपायकारक आणि विना शस्त्रक्रिया आहे.

काही घरगुती उपाय

1) एक कप कोमट पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मध मिश्रित करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण प्यावे. 

2) रोज झोपण्याआधी कोमट पाण्यात वेलची पावडर मिश्रित करून प्यावे. यानेही घोरण्याची समस्या कमी होते. 

3) हळद ही अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. रोज झोपण्याच्या अर्धातासआधी हळद घातलेलं दूघ प्यावे. यानेही घोरण्याची समस्या कमी होईल.

4) झोपण्यापूर्वी पाण्यात पुदीन्याच्या तेलाचे काही थेंब टाकून गुरळा करा. याने नाकाच्या छिद्रांवरील सूज कमी होईल आणि श्वास घेण्यास सोपं होईल. 
 

Web Title: Researchers develop AI based smart pillow block out partners snoring on bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.