अक्रोड खाल्ल्याने कमी होऊ शकते डिप्रेशनची समस्या - रिसर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:25 AM2019-02-09T10:25:23+5:302019-02-09T10:28:49+5:30

डिप्रेशन हा सध्याच्या लाइफस्टाइल सतत कानावर येणारा शब्द. डिप्रेशन येण्याची वेगवेगळी कारणे आहेत.

New study says that eating walnuts may decrease the risk of depression | अक्रोड खाल्ल्याने कमी होऊ शकते डिप्रेशनची समस्या - रिसर्च

अक्रोड खाल्ल्याने कमी होऊ शकते डिप्रेशनची समस्या - रिसर्च

Next

डिप्रेशन हा सध्याच्या लाइफस्टाइल सतत कानावर येणारा शब्द. डिप्रेशन येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यत कुणीही डिप्रेशनचे शिकार होऊ शकतात. त्यामुळे यातून बाहेर कसं येतं येईल यावर वेगवेगळे रिसर्च सतत सुरू असतात. वेगवेगळ्या ड्रायफ्रूट्सचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला चांगलेच माहीत असतील. बदाम, काजू, खजूरसोबतच अक्रोडही आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर ठरतं. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार अक्रोड खाल्ल्याने डिप्रेशनचा धोका कमी होऊ शकतो. तसेच याने व्यक्तीची एकाग्रताही चांगली वाढू शकते. 

कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील अभ्यासकांना नियमित अक्रोड खाणाऱ्या लोकांमध्ये डिप्रेशनचा स्तर २६ टक्के कमी आढळला तर त्याचप्रमाणे इतर पदार्थ खाणाऱ्यांमध्ये अक्रोड डिप्रेशनचा स्तर ८ टक्के कमी आढळला. हा रिसर्च न्यूट्रेंट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

(Image Credit : www.mentalhealthns.ca)

या रिसर्चमधून असं आढळलं की, अक्रोड खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा वाढते आणि एकाग्रताही चांगली वाढते. विश्वविद्यालतील प्रमुख अभ्यासक लेनोर अबर यांनी एका दुसऱ्या रिसर्चचा हवाला देत सांगितले की, अध्ययनात सहभागी करून घेण्यात आलेल्या ६ पैकी एक वयस्क व्यक्ती जीवनात एका वळणावर डिप्रेशनने ग्रस्त होईल. 

यापासून बचाव करण्यासाठी योग्य उपाय करणे गरजेचे आहे. जसे की, खाण्याच्या सवयी बदलने. अरब यांनी सांगितले की, अक्रोडवर आधी हृदयरोगाशी संबंधित शोध करण्यात आला होता आणि आता याचा डिप्रेशनशी संबंध करून बघितले जात आहे. या रिसर्चमध्ये २६ हजार अमेरिकन वयस्क लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. 

अक्रोड खाल्ल्याने टेन्शनही दूर पळते असे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या या संशोधनातून अक्रोड खाल्याने पुरूषांच्या तणावामध्ये काही फरक पडतो का? यावर अभ्यास करण्यात आला. दररोज मुठभर अक्रोड खाण्यामुळे पुरूषांमध्ये बराचसा तणाव कमी होतो, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणावरही अक्रोड लाभदायक आहे. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन इ, अल्फा लिनोलेनिक अ‍ॅसिड, पॉलिफेनॉल्स असे उपयुक्त घटक असल्याने त्याच्या नियमित सेवनाने 28 टक्के पुरुषांच्या तणावग्रस्त आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे सिद्ध झाले आहे.

अक्रोड खाल्याने होणारे इतर फायदे

- शरीरावर एखाद्या भागामध्ये आपल्याला वेदना, जळजळ होत असेल किंवा सुज आली असेल तर त्या ठिकाणी अक्रोडच्या सालाचा लेप लावा आराम मिळेल. अक्रोडची पाने चावल्याने आपल्या दातात होणाऱ्या वेदना कमी होतात. रोज अक्रोड खाल्याने शरीरावर होणाऱ्या सफेद डागांची समस्या दूर होते.

- डाएटमध्ये दररोज 5 अक्रोड आणि 15 ते 20 मनुक्यांचा समावेश केला तर अनिद्रेची समस्या दूर होते. अक्रोडमध्ये मेलाटोनिन आढळून येतं जे झोपेसाठी परिणामकारक ठरतं. 

- अक्रोड लिव्हर संबंधित समस्या, थायरॉइड, सांधे दुखी तसेच पिंपल्स, डायबेटीज यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. 

- अक्रोड हाडं मजबूत करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर दातांचे आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असतं. त्यामुळे याचं सेवन करणं हदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. 

- अक्रोडमध्ये कॅन्सररोधी गुणधर्म असतात. त्यामध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट असतात, जे कॅन्सर वाढण्यापासून रोखतात. तसेच ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठीही अक्रोड लाभदायक ठरतं. 

- अक्रोड रक्तातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी ठेवण्याचं काम करतं. तसेच पचनासाठीही मदत करतं. पोटाच्या समस्यांवरही अक्रोड फायदेशीर ठरतं. एका दिवसामध्ये 2 ते 3 अक्रोड खाल्याने वजन कमी होतं. 

- अक्रोडमध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन-ई आणि प्रोटीन आढळून येतं. याच्या नियमित सेवनाने केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत होते. 

- गरोदर महिलांसाठी अक्रोडचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. पोटातील बाळाला पोषण पुरविण्यासाठी अक्रोड मदत करतं.  अक्रोडच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि शरीराला आवश्यक एनर्जी मिळते. 

- तुम्ही वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर अक्रोडचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: New study says that eating walnuts may decrease the risk of depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.