आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन येणार; गर्भधारणेची चिंता 13 वर्षे टळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 12:08 PM2019-01-14T12:08:44+5:302019-01-14T12:14:28+5:30

इंजेक्शनच्या सर्व चाचण्या पूर्ण; लवकरच आरोग्य मंत्रालयाचा हिरवा कंदील मिळणार

New Contraceptive Injection For Men Will Be Effective For 13 Years To Prevent Pregnancy | आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन येणार; गर्भधारणेची चिंता 13 वर्षे टळणार

आता पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन येणार; गर्भधारणेची चिंता 13 वर्षे टळणार

googlenewsNext

नवी दिल्ली: नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आता पुरुषांना नसबंदी करण्याची गरज भासणार नाही. कारण लवकरच गर्भनिरोधक इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. भारतीय संशोधकांनी या इंजेक्शनची निर्मिती केली आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या देखरेखीखाली इंजेक्शनची चाचणी नुकतीच पूर्ण करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आरोग्य मंत्रालयाला सोपवण्यात आला. त्यामुळे लवकरच या इंजेक्शनच्या वापराला हिरवा कंदील मिळू शकतो.

गर्भधारणा टाळण्यासाठी आतापर्यंत पुरुषांना शस्त्रक्रिया करावी लागायची. मात्र यापुढे तशी गरज भासणार नाही, अशी माहिती इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये संशोधक असलेल्या डॉ. आर. एस. शर्मांनी दिली. आता केवळ इंजेक्शनच्या मदतीनं गर्भधारणा रोखता येईल. चाचणीत हे इंजेक्शन 95 टक्के यशस्वी ठरलं आहे. विशेष म्हणजे हे इंजेक्शन घेतल्यावर 13 वर्षे गर्भधारणा रोखता येते. या इंजेक्शनमुळे 13 वर्षे गर्भधारणा टाळता येते, याची आकडेवारी आमच्याकडे आहे. मात्र हे इंजेक्शन त्याहीपेक्षा जास्त काळ काम करेल, असा आम्हाला विश्वास असल्याचं शर्मांनी सांगितलं. 

असं काम करतं इंजेक्शन?
आयआयटी खरगपूरमधील संशोधक डॉ. एस. के. गुहा यांनी इंजेक्शनमध्ये वापरलं जाणारं औषध तयार केल्याची माहिती शर्मा यांनी दिली. या औषधात सिंथेटिक पॉलिमर आहे. नसबंदी करताना दोन नसा कापून उपचार केले जातात. मात्र यामध्ये त्याच दोन नसांमध्ये इंजेक्शन दिलं जातं. या दोन नसांमधून शुक्राणू पुढे सरकतात. त्यामुळेच गर्भधारणा रोखण्यासाठी या दोन्ही नसांमध्ये इंजेक्शन दिलं जातं. या इंजेक्शनमध्ये 60 मिलीचा एक डोस असतो. 

गर्भनिरोधक इंजेक्शन दिल्यावर शुक्राणू तुटतात. त्यामुळे गर्भधारणा होत नाही, अशी माहिती डॉक्टर शर्मा यांनी दिली. उंदीर, ससा आणि त्यानंतर इतर प्राण्यांवर या इंजेक्शनची चाचणी घेण्यात आली आहे. माणसांवरही या इंजेक्शनची चाचणी घेण्यात आली. एकूण 303 व्यक्तींना दोन टप्प्यांमध्ये इंजेक्शन देण्यात आलं. यातून हे इंजेक्शन गर्भधारणा रोखण्यात 99.2 टक्के यशस्वी ठरल्याचं त्यांनी सांगितलं. 
 

Web Title: New Contraceptive Injection For Men Will Be Effective For 13 Years To Prevent Pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.