शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 01:07 PM2018-10-14T13:07:11+5:302018-10-14T13:08:08+5:30

कधी कधी कारण नसताना अचानक शरीरातील हाडं किंवा शरीरातील स्नायूंमध्ये वेदना होतात का? अशातच औषध लावून किंवा अनेक उपचार करून देखील हे दुखणं कमी व्हायचं नाव घेत नसेल तर दुर्लक्ष करू नका.

natural home remedies for calcium deficiency | शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ट्राय करा!

शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ट्राय करा!

googlenewsNext

कधी कधी कारण नसताना अचानक शरीरातील हाडं किंवा शरीरातील स्नायूंमध्ये वेदना होतात का? अशातच औषध लावून किंवा अनेक उपचार करून देखील हे दुखणं कमी व्हायचं नाव घेत नसेल तर दुर्लक्ष करू नका. लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. अनेकदा शरीरातील कॅल्शिअमची लेव्हल कमी झाल्यामुळे हा त्रास होतो. 

कॅल्शिअम शरीराचं कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. आपले दात आणि हाडांमध्ये 99% कॅल्शिअम असतं. जेव्हा शरीरामध्ये कॅल्शिअमची कमतरता होते त्यावेळी हाडे कमकुवत आणि नाजुक होतात. अशावेळी हाडांना फ्रॅक्चर होण्याची भिती वाढते. मनवाच्या वाढत्य वयानुसार भासणारी कॅल्शिअमची मात्रा वेगवेगळी असते. वयोवृद्ध व्यक्तीमध्ये प्रतिदिन 1000-1300 मिलीग्रॅम, तरूणांमध्ये प्रतिदिन 1300 मिलीग्रॅम, लहान मुलांमध्ये 700-1000 मिलीग्रॅम आणि एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये प्रतिदिन 250 ते 300 मिलीग्रॅम कॅल्शिअमची आवश्यकता असते. 

औषधांप्रमाणेच काही घरगुती उपायांनीही शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढविणे शक्य होते. घरामध्ये अगदी सहज उपलब्ध होणारे पदार्थही शरीरातील कॅल्शिअमची मात्रा वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. जाणून घेऊयात कॅल्शिअमची कमतरता दूर करण्यासाठी काही उपाय...

1. आवळा 

आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टी-ऑक्सिडंट तत्व आढळून येतात. त्याचप्रमाणे कॅल्शिअमचे प्रमाणही मुबलक असते. जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर असते. तुम्ही एखाद्या फळाप्रमाणेही आवळा खाऊ शकता. त्याचप्रमाणे पाण्यामध्ये उकळूनही आवळा खाणं फायदेशीर ठरतं. 

2. तीळ 

कॅल्शिअमची कमतरता दूर करण्यासाठी तीळ हा उत्तम पर्याय आहे. एक चमचा तीळामध्ये जवळपास 88 मिलीग्रॅम कॅल्शिअम असतं. तीळ वाटून पावडरच्या स्वरूपातही खाता येतात. तुम्ही सलाड किंवा सूपमध्येही टाकून खाऊ शकता. 

3. दूध

दूध म्हणजे कॅल्शिअमचा सर्वात चांगला स्त्रोत समजला जातो. एक कप गरम दूधामध्ये एक चमचा भाजलेल्या तीळांची पूड मिक्स करा. दिवसातून तीन वेळा प्यायल्याने चांगले परिणाम दिसून येतील. 

4. जिरं

एक ग्लास पाण्यामध्ये एक टिस्पून जीरं मिक्स करा. हे पाणी थंड करून प्यावे. दिवसातून कमीतकमी दोन वेळा हे पाणी प्यावं. शरीरातील कॅल्शिअमची कमतरता दूर होण्यास मदत होईल. 

5. आलं

एक ग्लास पाण्यामध्ये 1 ते 2 आल्याचे तुकडे टाकून पाणी चांगलं उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी गाळून त्यामध्ये मध मिक्स करा. 

Web Title: natural home remedies for calcium deficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.