काय आहे चॉकलेट मेडिटेशन? जाणून घ्या फायदे आणि पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 11:40 AM2019-01-07T11:40:31+5:302019-01-07T11:40:53+5:30

मेडिटेशनचं वेगवेगळे प्रकार तुम्ही ऐकले असतील किंवा काहींनी वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन केलेही असतील.

Know what is chocolate meditation and its benefits | काय आहे चॉकलेट मेडिटेशन? जाणून घ्या फायदे आणि पद्धत!

काय आहे चॉकलेट मेडिटेशन? जाणून घ्या फायदे आणि पद्धत!

(Image Credit : mummypages.co.uk)

मेडिटेशनचं वेगवेगळे प्रकार तुम्ही ऐकले असतील किंवा काही लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन केलेही असतील. पण कधी तुम्ही चॉकलेट मेडिटेशन केलंय का? खरंतर असं मेडिटेशन आहे हे फारच कमी लोकांना माहीत असावं. पण तणावात असलेल्या लोकांसाठी चॉकलेट मेडिटेशन हे चांगलं असल्याचं सांगितलं जातं. चॉकलेट मेडिटेशनने तणाव दूर होऊन शरीराला आराम मिळतो. हे मेटिटेशन करण्याची पद्धतही वेगळी आहे. चला जाणून घेऊ चॉकलेट मेडिटेशनचे काय फायदे होतात.

काय आहे चॉकलेट मेडिटेशन?

चॉकलेट मेडिटेशनमध्ये एका चॉकलेटच्या तुकड्याचा वापर केला जातो. खासकरुन डार्क चॉकलेटचा वापर केला जातो. या मेडिटेशनदरम्यान चॉकलेट खाण्यासोबतच तुम्ही त्याचा सुगंधही फील करु शकता. या मेडिटेशनन वजन कमी करण्यासही मदत मिळते. तसेच याने शरीर आणि मेंदूला शांतता मिळते. त्यासोबतच याने शारीरिक आणि मानसिक तणावही कमी होऊन व्यक्तीमध्ये एक सकारात्मक बदल बघायला मिळतो. 

कसे करतात हे मेडिटेशन?

चॉकलेट मेडिटेशन करण्यासाठी तुमच्याकडे चॉकलेटचा एक मोठा तुकडा हवा. सर्वातआधी मोठा श्वास घ्या आणि शरीराच्या मांसपेशी शांत करा. याने शरीर हलकं होईल. नंतर डोळे बंद करा. आता चॉकलेटच्या सुगंधाला फील करा. असे मानले जाते की, चॉकलेटमध्ये जवळपास ३०० फ्लेवर असतात. आता एक छोटासा तुकडा खाऊन त्यांच्या फ्लेवरच आनंद घ्या. चॉकलेट खाल्ल्याने तुमच्या तोंडात एक प्रकारचं सेन्सेशन होतं. या सेन्सेशनवर लक्ष केंद्रीत करा. हळूहळू पूर्ण चॉकलेट खा. 

शेवटी काही सेकंदासाठी थांबा आणि मोठा श्वास घ्या. नंतर सामान्य स्थितित परत या. हे केल्यानंतर तुम्हाला तणाव कमी झाल्यासारखे वाटेल, मानसिक शांती आणि आनंद मिळेल. कारण चॉकलेटमध्ये असलेले तत्व मूड फ्रेश करण्यासोबतच आनंद सुद्धा देतात. 

Web Title: Know what is chocolate meditation and its benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.