रिकाम्या पोटी डाळिंब खाल तर किडनी राहते हेल्दी, शरीराला मिळतात अनेक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 10:19 AM2023-02-24T10:19:45+5:302023-02-24T10:20:57+5:30

Health Benefits Of Pomegranate : आता उन्हाळा सुरू झालाय. या दिवसांमध्ये तुम्ही जर रिकाम्या पोटी डाळिंब खाल तर याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. चला जाणून घेऊ रिकाम्या पोटी डाळिंब खाण्याचे काय फायदे मिळतात.

Kidney remains healthy by eating pomegranate daily on an empty stomach | रिकाम्या पोटी डाळिंब खाल तर किडनी राहते हेल्दी, शरीराला मिळतात अनेक फायदे

रिकाम्या पोटी डाळिंब खाल तर किडनी राहते हेल्दी, शरीराला मिळतात अनेक फायदे

googlenewsNext

Health Benefits Of Pomegranate : बरेच लोक आता आरोग्याबाबत खूप काळजी घ्यायला लागले आहेत. आरोग्य चांगलं रहावं म्हणून बरेच लोक दिवसाची सुरूवात फळं खाऊन किंवा ज्यूस पिऊन करतात. मात्र, ज्यूसच्या तुलनेत फळ खाणंच अधिक फायदेशीर मानलं जातं. कारण फळांमधूनच डायट्री फायबर आणि अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात. ज्यामुळे पचनतंत्र चांगलं राहतं. आता उन्हाळा सुरू झालाय. या दिवसांमध्ये तुम्ही जर रिकाम्या पोटी डाळिंब खाल तर याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. चला जाणून घेऊ रिकाम्या पोटी डाळिंब खाण्याचे काय फायदे मिळतात.

अ‍ंटीऑक्सीडेंट

डाळिंबामध्ये पॉलिफेनोल्स नावाचं फायटोकेमिकल्स असं जे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. डाळिंब रोज जर रिकाम्या पोटी खाल्लं तर शरीरातील पेशांनी फ्री-रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर रोज डाळिंबाचं सेवन केल्याने इम्यूनिटी बूस्ट करण्यासही मदत मिळते. 

किडनी राहते हेल्दी

डाळिंबातील अ‍ॅंटीऑक्सीडेंट किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. तेच जर तुम्हाला किडनी निरोगी ठेवायची असेल तर डाएटमध्ये डाळिंबाचा समावेश करा. डाळिंब रिकाम्या पोटीच खाल तर जास्त फायदा मिळेल.

सूज होते दूर

डाळिंबामुळे शरीरातील सूज कमी करण्यासही मदत मिळते. कारण यात सूज कमी करणारे अनेक तत्व असतात. शरीरावर सूज असेल तर सकाळी रिकाम्या पोटी डाळिंबाचं सेवन करा.

अनेक आजार राहतात दूर

डाळिंबातील अ‍ॅंटीमाइक्रोबियल गुण याला एक प्रभावी अ‍ॅंटीबायोटिक बनवतात. ज्यामुळे संक्रमण आणि नुकसानकारक बॅक्टेरियासोबत लढण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला हेल्दी रहायचं असेल डाळिंबाचं सेवन नियमितपणे करा.

Web Title: Kidney remains healthy by eating pomegranate daily on an empty stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.