स्वस्तात मस्त मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष तपासणीची गरज : फ्रूट ज्युससाठी सुमार फळांचा वापर

By admin | Published: April 12, 2016 12:37 AM2016-04-12T00:37:50+5:302016-04-12T00:37:50+5:30

जळगाव : एप्रिल महिन्यातच उन्हामुळे सर्वांगाची लाहीलाही होत असताना जळगाव शहरासह परिसरात गल्लोगल्ली पाच रुपयात मठ्ठा विक्री तसेच शीतपेयाच्या विक्रीची दुकाने थाटली आहे. स्वतात मस्त च्या लोभापाई आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्यावरच्या फ्रूट ज्युसच्या हातगाडीवर कमी प्रतिची आणि हलक्या दर्जाच्या फळांचा वापर होत असल्याने आरोग्यविषयक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Inexpensive, but neglected health needs: the use of fine fruits for fruit juices | स्वस्तात मस्त मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष तपासणीची गरज : फ्रूट ज्युससाठी सुमार फळांचा वापर

स्वस्तात मस्त मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष तपासणीची गरज : फ्रूट ज्युससाठी सुमार फळांचा वापर

Next
गाव : एप्रिल महिन्यातच उन्हामुळे सर्वांगाची लाहीलाही होत असताना जळगाव शहरासह परिसरात गल्लोगल्ली पाच रुपयात मठ्ठा विक्री तसेच शीतपेयाच्या विक्रीची दुकाने थाटली आहे. स्वतात मस्त च्या लोभापाई आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्यावरच्या फ्रूट ज्युसच्या हातगाडीवर कमी प्रतिची आणि हलक्या दर्जाच्या फळांचा वापर होत असल्याने आरोग्यविषयक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
दही ९० रुपये किलो तर ताक १८ रुपये लीटर
उन्हाळ्यात दुधाची आवक ही कमी होत असते. त्यामुळे या काळात दूध, दही व ताकाचे भाव थोडे जादा असतात. सध्या खुल्या बाजारात दही ९० रुपये किलोने तर ताक १८ रुपये लीटरने विक्री होत आहे. चांगल्या प्रतिच्या एक किलो द‘ामध्ये किमान चार ते साडे चार लिटर ताक तयार होत असते. तर एक लीटर ताकामध्ये किमान २०० मिलीचे पाच ग्लास तयार होत आहे.

चवीसाठी पुदीना व अन्य साहित्याचा वापर
ताकापासून मठ्ठा तयार करताना त्याला चव यावी यासाठी ताकामध्ये पुदिना, आद्रक, कोथींबीर, मीठ आणि तिखट बुंदीचा वापर करण्यात येत असतो. यासार्‍याचा खर्च हा प्रत्येक ग्लासामागे ५० पैशांच्या जवळपास असतो. त्यामुळे एका ग्लाससाठी सहा ते सात रुपये घरात पडत असताना विक्रेत्याकडून पाच रुपयात होणारी विक्री हे व्यवसायाचे अजब गणित आहे.

स्वच्छता व पर्यावरणाला धोका
पाच रुपयांमध्ये मठ्ठा विक्री होत असताना तो तयार करीत असताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असते. त्यासोबतच तो प्लास्टिकच्या ग्लासमध्ये देण्यात येत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. बहुतांशवेळा आदल्या दिवशी न संपलेले ताक हे दुसर्‍या दिवशी त्याचा मठ्ठा तयार करण्यासाठी वापर होत असल्याने आरोग्याविषयी प्रश्न निर्माण होत आहे.
१५ हजार लीटरची मागणी
जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचा तडाका बसत आहे. तापमानाने चाळीशी पार केल्यानंतर दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदी सारखी स्थिती आहे. त्यातच सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तसेच लग्नसराईचा मोसम असल्याने खरेदीसाठी व परीक्षार्थींची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. उन्हाळ्यात गारवा मिळविण्यासाठी अनेकांची पावले या स्वतात मस्त असलेल्या मठ्ठ्याच्या स्टॉलकडे वळत आहेत. सध्या जळगाव शहरात १५ हजार लीटर ताकाची उलाढाल होत आहे.

Web Title: Inexpensive, but neglected health needs: the use of fine fruits for fruit juices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.