'या' कारणांमुळे पोटावर झोपणे आरोग्याच्या दृष्टीने ठरू शकते घातक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 05:53 PM2018-07-07T17:53:55+5:302018-07-07T17:54:10+5:30

झोप ही आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. रोज फ्रेश राहण्यासाठी पूर्ण झोप घेणे गरजेचे असते. अपूर्ण झोपेमुळे बऱ्याचदा अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे आपण कसे झोपतो? याचाही आपल्या आरोग्यावर चांगला-वाईट परिणाम होत असतो.

ill effect of sleeping on your tummy is bad for your health | 'या' कारणांमुळे पोटावर झोपणे आरोग्याच्या दृष्टीने ठरू शकते घातक!

'या' कारणांमुळे पोटावर झोपणे आरोग्याच्या दृष्टीने ठरू शकते घातक!

googlenewsNext

झोप ही आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. रोज फ्रेश राहण्यासाठी पूर्ण झोप घेणे गरजेचे असते. अपूर्ण झोपेमुळे बऱ्याचदा अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे आपण कसे झोपतो? याचाही आपल्या आरोग्यावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. अनेक जणांना पालथे म्हणजेच पोटावर झोपल्याशिवाय झोप येत नाही. पण असे करणे शरीरासाठी घातक ठरू शकते. जाणून घेऊयात पोटावर झोपल्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात...

- पोटावर झोपल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे स्नायूंना इजा पोहोचण्याची शक्यता असते.

- पोटावर झोपल्याने मणक्याचे आजार जडण्याचीही शक्यता असते.

- पोटावर झोपल्यामुळे पाठ दुखते तसेच पाठीच्या कण्याचा आकारही बदलतो.

-  पोटावर झोपल्यामुळे अन्नपचनाचाही त्रास बळावतो. त्यामुळे अपचनाची समस्या तसेच पचनक्रियेवरही परिणाम होतो.

- पोटावर झोपताना मान सतत एकाच बाजूला राहते. यामुळे डोक्यापर्यंत रक्तपुरवठा योग्य पद्धतीने होत नाही. असे केल्याने डोकेदुखी, मान आखडणे, मान मुरगळणे असे त्रास उद्भवतात.

- पोटावर झोपण्याची सवय असलेल्यांना अपस्मारीचा विकार जडण्याची शक्यता असते. अपस्मार हा मेंदूशी संबंधित आजार असून यामुळे फिटस् येतात.

- पोटावर झोपण्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेला आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. कारण पोटावर झोपल्याने चेहऱ्यावरही दाब पडतो.
 

Web Title: ill effect of sleeping on your tummy is bad for your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.