मनुष्यांच्या कवटीतून शींग येताहेत बाहेर, कारण वाचून उडेल तुमची झोप!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 01:26 PM2019-06-22T13:26:09+5:302019-06-22T14:15:32+5:30

Washington Post च्या एका रिपोर्टनुसार, आता माणसाच्या कवटीमध्ये शींग उगवत आहेत. 

Humans are growing horns in their skull by overusing phone | मनुष्यांच्या कवटीतून शींग येताहेत बाहेर, कारण वाचून उडेल तुमची झोप!

मनुष्यांच्या कवटीतून शींग येताहेत बाहेर, कारण वाचून उडेल तुमची झोप!

googlenewsNext

मोबाइल आपल्याला इतकी सवय झाली आहे की, ती सोडवणं आता कठीण झालं आहे. मोबाइलच्या सवयीमुळे तर कित्येक घरात दरी पडली तर अनेकांचे ब्रेकअप झाले आहेत. कुणाला जर सांगितलं की, १ महिना मोबाइल वापरू नका तर समोरची व्यक्ती तुम्हाला वेड्यात काढेल.

काही लोक असतीलही जे मोबाइल बाजूला ठेवून वेळ घालवू शकतात. पण काही लोक एक दिवसही मोबाइलशिवाय राहू शकणार नाहीत. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे बंद होईपर्यंत मोबाइल काही सुटत नाही.

मोबाइलमुळे लोकांना काय काय विकार होताहेत हे नेहमीच समोर येत असतं. त्याचे दुष्परिणामही अनेकांनी अनुभवलेले असतात. पण कुणालाही काही पडलेली नाही. आता तर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. Washington Post च्या एका रिपोर्टनुसार, आता माणसाच्या कवटीमध्ये शींग उगवत आहेत. 

रिपोर्टनुसार, रिसर्चमध्ये आढळलं की, फोनच्या अत्याधिक वापरामुळे मनुष्यांच्या कवटीमध्ये शिंगासारखं काही उगवत आहे. पुढच्या बाजूने वाकून फोनचा वापर केला जात असल्याने Spine चं वजन डोक्याच्या मागच्या Muscles वर पडत आहे. त्यामुळे तेथील चामडी जाड होऊन Callus(तंतुग्रंथी) मध्ये बदलत आहे.

म्हणजेच हेच की, मानेच्या ठिक वरच्या बाजूला कवटीमध्ये शिंगांसारखं काही उगवत आहे. University of the Sunshine Coast, ऑस्ट्रेलियाच्या अभ्यासकांनी हा रिसर्च केला. त्यांचं म्हणणं आहे की, स्मार्टफोन आणि इतर गॅजेट्सचा अत्याधिक वापर केल्याने मनुष्यांना हा विकार होत आहे.

Web Title: Humans are growing horns in their skull by overusing phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.