रोज वेळेवर आणि पुरेशी झोप घेण्याचे हे आहेत फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 11:43 AM2018-06-15T11:43:30+5:302018-06-15T11:43:30+5:30

रात्री अर्धवट झोप झाल्यास दिवसभर थकल्यासारखे आणि अस्वस्थ वाटते. सातत्याने अपुरी झोप मिळाल्यास त्याचा परिणाम तुमच्यावर आणि तुमच्या आरोग्यावर होतो. माझ्या मोबाईलच्या व्यसनामुळे माझे झोपेचे चक्र बिघडले.

Health benefits of sleeping early at night | रोज वेळेवर आणि पुरेशी झोप घेण्याचे हे आहेत फायदे!

रोज वेळेवर आणि पुरेशी झोप घेण्याचे हे आहेत फायदे!

googlenewsNext

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात पूर्ण झोप होणे जरा अनेकांसाठी कठीण काम झालं आहे. पण पुरेशी झोप होत नसल्याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे कितीही काम असलं तरी वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करायला हवा. 

रात्री अर्धवट झोप झाल्यास दिवसभर थकल्यासारखे आणि अस्वस्थ वाटते. सातत्याने अपुरी झोप मिळाल्यास त्याचा परिणाम तुमच्यावर आणि तुमच्या आरोग्यावर होतो. माझ्या मोबाईलच्या व्यसनामुळे माझे झोपेचे चक्र बिघडले.  रात्री कॉफी पिणे, फ्रेंड्ससोबत गप्पा करणे यामुळे ही झोप येत नाही. तसंच गप्पा करताना किती कॉफी घेतली जाते याचा आपल्याला अंदाजच नसतो. आणि कॅफेनचा आपल्या झोपेवर काय परिणाम होतो. 

1) चेहऱ्यावरील डाग कमी होतात : लवकर झोपण्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होऊ लागतात. आणि काळे डाग हळूहळू कमी व्हायला लागले आहेत. 

2) ब्लड ग्लुकोज कमी होत नाही: पुरेशा झोपेचा परिणामामुळे hypoglycaemia चा त्रास पूर्णपणे नाहीसा होतो. त्यामुळे ब्लड ग्लुकोज कमी होत नाही.

3) भूकेत सुधारणा होते : पुरेशी झोप झाल्यास चांगली भूक लागते. हेल्दी पदार्थ खावेसे वाटतात. 

4) मायग्रेनचा त्रास कमी होतो : कमी खाणे, जास्त किंवा कमी झोप, खूप रडणे किंवा खूप हसणे या कशाही मुळे मायग्रेनचा त्रास जाणवत नाही. कारण तुम्ही पुरेशी झोप घेत असता. 

5) कार्यक्षमतेत वाढ होते : ८ तास पुरेशी आणि शांत झोप घेतल्यामुळे अधिक तत्परतेने काम करू शकता. तुमची कार्यक्षमता वाढते.

Web Title: Health benefits of sleeping early at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.