रात्रीच्या जेवणामध्ये जंक फूड खाताय?; मग जाणून घ्या धोके

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 12:17 PM2019-05-12T12:17:32+5:302019-05-12T12:19:52+5:30

आपल्या डेली डाएटमध्ये रात्रीचा आहाराचं अत्यंत महत्त्वाचा असतो. रात्रीच्या जेवणात जर तुम्ही पचण्यासाठी हलके नसणाऱ्या पदार्थांचं सेवन करत असाल तर, यामुळे तुम्हाला आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Eat junk food in dinner know how its danger | रात्रीच्या जेवणामध्ये जंक फूड खाताय?; मग जाणून घ्या धोके

रात्रीच्या जेवणामध्ये जंक फूड खाताय?; मग जाणून घ्या धोके

आपल्या डेली डाएटमध्ये रात्रीचा आहाराचं अत्यंत महत्त्वाचा असतो. रात्रीच्या जेवणात जर तुम्ही पचण्यासाठी हलके नसणाऱ्या पदार्थांचं सेवन करत असाल तर, यामुळे तुम्हाला आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही काही अशा पदार्थांबाबत सांगणार आहोत. डेली डाएटमध्ये तुम्ही डिनर करत नसाल, तरिही तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. परंतु जर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्ही जंक फूडचं सेवन करत असाल, तर तुमच्या आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होतात. जाणून घेऊया रात्रीच्या जेवणात जंक फूडचं सेवन केल्याने आरोग्याला होणाऱ्या नुकसानांबाबत...

जंक फूडमुळे झोपेवर होतो परिणाम

जर तुम्ही दररोज रात्री जंक फूड खाऊन झोपत असाल तर, तुम्हाला सावधान राहण्याची गरज आहे. यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतातच पण त्याचसोबत झोपेवरही परिणाम होतात. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या रिसर्चमधून असं समजलं की, जर रात्रीच्या आहारामध्ये जंक फूडचा समावेश केला तर त्याचा थेट परिणाम झोपेवर होतो. 

काय म्हणतं संशोधन?

रिसर्च अमेरिकेतील टक्सन येथे असणाऱ्या एरिजोना विश्वविद्यालयातील मनोचिकित्सा विभागात करण्यात आला. फोनवरून लोकांशी संवाद साधून त्यातून समोर आलेल्या आकड्यांचे विश्लेषण करण्यात आले. या रिसर्चमध्ये  3,105 तरूणांना सहभागी करण्यात आले होते. या रिसर्चमध्ये सहभागी झालेल्या लोकांना झोपेच्या समस्यांव्यतिरिक्त लठ्ठपणा, ब्लड शुगर आणि इतर आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत होता. 

एरिजोना विश्वविद्यालयामधील मनोचिकित्स विभागाचे मायकल ए ग्रँडनर सांगतात की, संशोधनातून असं सिद्ध झालं की, रात्री जंक फूड खाल्याने झोपेवर परिणाम होतो आणि झोप कमी होते. तसेच याव्यतिरिक्त लठ्ठपणाच्या समस्यांचाही सामना करावा लागतो. 

झोपेच्या कमतरेतमुळे होते समस्यांमध्ये वाढ 

ग्रँडनर सांगतात की, झोपेची कमतरता, जंक फूडची सवय आणि रात्रीच्या वेळी अनहेल्दी पदार्थ खाणं यांतील संबंध महत्वपूर्ण पद्धत प्रस्तुत करते. झोप मेटाबॉलिज्मच्या क्रियेचे नियमन करण्यासाठी मदत करते. 

फोनवरून करण्यात आलेला हा सर्वे रिसर्च बाल्टीमोरमध्ये असोसिएटेड प्रोफेशनल स्लीप सोसायटीज एलएलसी (एपीएसएस) च्या 32व्या वार्षिक बैठकित प्रस्तुत करण्यात आला होता. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 

Web Title: Eat junk food in dinner know how its danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.