अ‍ॅसिडीटीने हैराण झाले असाल तर या पदार्थांचं कमी करा सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 11:47 AM2019-02-27T11:47:27+5:302019-02-27T11:47:31+5:30

एका वयानंतर खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये केलेलं थोडं दुर्लक्ष आरोग्यासाठी महागात पडू शकतं. कधीकाळी तुम्ही चॉकलेट आणि केक भरपूर प्रमाणात खात होते.

Diet if you are anxious with acidity then eat these five things in limit | अ‍ॅसिडीटीने हैराण झाले असाल तर या पदार्थांचं कमी करा सेवन!

अ‍ॅसिडीटीने हैराण झाले असाल तर या पदार्थांचं कमी करा सेवन!

एका वयानंतर खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये केलेलं थोडं दुर्लक्ष आरोग्यासाठी महागात पडू शकतं. कधीकाळी तुम्ही चॉकलेट आणि केक भरपूर प्रमाणात खात होते, पण हे आता तुम्हाला तीस वयानंतर जास्त प्रमाणात खाणं नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे हे गरजेचं आहे की, वाढत्या वयासोबत तुम्ही नुकसानकारक पदार्थ खाणे कमी केले तर तुमचा फायदा होईल. नेहमी होणारी अ‍ॅसिडीटी आणि गॅसची समस्या भविष्यात होणाऱ्या गंभीर समस्येचे संकेत असू शकतात. 

(Image Credit : NetDoctor)

चॉकलेट - चॉकलेट चवीला जरी चांगले वाटत असले तरी हे पोटासाठी फार नुकसानकारक ठरू शकतात. अ‍ॅसिडीटीची समस्या असणाऱ्या लोकांना चॉकलेट खाणे टाळावे. कारण यात कॅफीन आणि थियोब्रोमाइनसारखे अन्य पदार्थ असतात. याने पोटात अॅसिड तयार होतं. यात कॉफीचं फॅटही असतं. ज्याने अ‍ॅसिड तयार होतं. तसेच यात भरपूर कोको असतं, ज्यामुळेही पोटाची समस्या वाढते. 

(Image Credit : FamilyDoctor.org)

अल्कोहोल - बीअर आणि वाइनसारख्या मादक द्रव्याने केवळ पोटच बिघडतं असं नाही तर गॅस्ट्रिक अ‍ॅसिडी भरपूर वाढतं. तसेच शरीराला डिहायड्रेशनची समस्या होते आणि शरीरात अ‍ॅसिड तयार होतं. त्यासोबतच मद्यसेवन सोडा किंवा कार्बोनेटेड पेयासोबत मिश्रित करून घेत असाल तरी सुद्धा समस्या होतात.  

कॅफीन - एका दिवसात एक कप कॉफी किंवा चहा पिणे ठीक आहे. मात्र याचं अधिक सेवन केल्याने तुम्ही अ‍ॅसिडीटीचे शिकार होऊ शकता. कारण यात भरपूर प्रमाणात कॅफीन असतं. कॅफीनच्या सेवनामुळे पोटात गॅस्ट्रिक अ‍ॅसिडचा स्त्राव वाढतो आणि अ‍ॅसिडीटी होते. तसेच कधीही रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफीचं सेवन करू नये. 

सोडा - पोटा अ‍ॅसिड तयार होण्यासाठी सोडा आणि इतर कार्बोनेटेड पेय कारणीभूत ठरतात. कार्बोनेटेडचे बुडबुडे पोटाच्या आत पसरतात. त्यामुळे वाढत्या दबावाच्या कारणाने पोटात जळजळ होऊ लागते. सोड्यामध्ये सुद्धा कॅफीन असतं, ज्यामुळे अॅसिड तयार होतं. 

मसालेदार पदार्थ - मसालेदार पदार्थांचं अधिक सेवन केल्याने आरोग्यावर वाइट परिणाम होऊ शकतो. मिरची, गरम मसाला आणि काळे मिरे हे पदार्थ नैसर्गिकपणे अ‍ॅसिडीक असतात. हे पदार्थ खाल्ल्याने अॅसिड तयाह होऊ लागतं. पण याचं सेवन कमी प्रमाणात केलं तर याचे तुम्हाला वेगवेगळे फायदे होऊ लागतात. 

Web Title: Diet if you are anxious with acidity then eat these five things in limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.