ब्लॅक कॉफी पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 01:23 PM2018-08-16T13:23:34+5:302018-08-16T13:25:32+5:30

भारतात अनेक लोकं दूधाची कॉफी पिणं पसंत करतात. पण त्याबदल्यात ब्लॅक कॉफी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होईल.

Benefits of drinking black coffee daily | ब्लॅक कॉफी पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

ब्लॅक कॉफी पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

googlenewsNext

भारतात अनेक लोकं दूधाची कॉफी पिणं पसंत करतात. पण त्याबदल्यात ब्लॅक कॉफी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे एखाद्या दुखण्यापासूनही तुमची सुटका होईल.

कॉफीमध्ये असलेलं कॅफेन आपल्या मेंदूमधील डोपामीनची लेवल वाढवतं. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता यांसारख्या मेंदूशी जोडलेल्या क्रिया चांगल्या होतात. तसेच यामुळे तुमची एनर्जी लेव्हलही वाढते. 
ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यासाठी मदत करते. कॅफेन शरीरातील मेटाबॉलिकचे प्रमाण वाढवते. त्यामुळे शरीरातील फॅट लवकर बर्न होतात. तसेच ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन लवकर घटवण्यासाठीही मदत होते. 

ब्लॅक कॉफीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमिन, मिनरल्स यांसारख्या गोष्टी अस्तित्वात असतात. अॅन्टीऑक्सिडंट हेल्थशी संबंधित जुन्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. तसेच कॅन्सरच्या समस्या दूर करण्यास मदत करते. 
ब्लॅक कॉफी मधुमेहाच्या सर्व शक्यता दूर करण्यास मदत करतं. . तसेच हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं. ब्लॅक कॉफीच्या सेवनाने शरीरातील इंसुलिनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होते. 

कॅफेन  एडेनोसाइन रिसेप्टर्सला  (adenosine receptors)  ब्लॉक करतं. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही दुखण्यापासून सुटका होते. पण कॉफीमध्ये कॅफेन असल्यामुळे जास्त सेवन केलं तर शरीराला नुकसानही पोहचवू शकते. त्यामुळे कॉफीचे जास्त सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

Web Title: Benefits of drinking black coffee daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.