ड जीवनसत्त्वाच्या गोळ्यांचा खरंच फायदा होतो का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 02:12 PM2018-10-08T14:12:42+5:302018-10-08T14:14:49+5:30

जे लोक सूर्यप्रकाशात जात नाहीत, सतत घरात राहतात किंवा बाहेर गेले तरी त्वचा पूर्ण झाकतात अशा लोकांना ड जिवनसत्त्वाची कमतरता भासू शकते.  हाडांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी सतत कार्यरत राहाणे, धूम्रपान बंद करणे, शरीरयष्टी अतीबारिक न ठेवणे आणि ओस्टीओपोरोसिस कमी करण्यासाठी औषधे घेणे आवश्यक आहे

Are vitamin D Supplements helpful? | ड जीवनसत्त्वाच्या गोळ्यांचा खरंच फायदा होतो का?

ड जीवनसत्त्वाच्या गोळ्यांचा खरंच फायदा होतो का?

googlenewsNext

न्यू यॉर्क- ड जिवनसत्वाच्या सप्लिमेंटसचा उपयोग वृद्ध व्यक्तींच्या हाडांची स्थिती सुधारावी तसेच हाडे कमकुवत करणाऱ्या ओस्टीओपोरोसिससारख्या आजारांमध्ये केला जातो. मात्र एका नव्या संशोधनानुसार सूर्यप्रकाशातून मिळणारे ड जीवनसत्त्व या सप्लिमेंटसमध्ये नसते असे स्पष्ट झाले आहे. हाडांची घनता वाढावी, हाडे तुटण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी या गोळ्यांचा उपयोग होईलच असे नाही असे या संशोधकांचे म्हणणे आहे. ड जीवनसत्त्व मुख्यत्त्वे सूर्यप्रकाशातून  मिळते. 

ड जिवनसत्त्वाची सप्लिमेंटस घेणं अगदी सामान्य गोष्ट आहे. उत्तर अमेरिकेमध्ये ४० टक्के वृद्ध त्यांचा वापर करतात. लहान मुलांमध्ये रिकेटस किंवा प्रौढांमध्ये ओस्टीओमलेसिया (हाडे मृदू होणं) अशा आजारांमध्ये त्यांचा उपयोग होतो.  जे लोक सूर्यप्रकाशात जात नाहीत, सतत घरात राहतात किंवा बाहेर गेले तरी त्वचा पूर्ण झाकतात अशा लोकांना ड जिवनसत्त्वाची कमतरता भासू शकते.  हाडांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी सतत कार्यरत राहाणे, धूम्रपान बंद करणे, शरीरयष्टी अतीबारिक न ठेवणे आणि ओस्टीओपोरोसिस कमी करण्यासाठी औषधे घेणे आवश्यक आहे असे मत या संशोधनाचं काम पाहाणाऱ्या डॉ. अ‍ॅलिसन अ‍ॅवेनेल यांनी व्यक्त केले.

अ‍ॅवेनेल यांच्या नव्या संशोधनानुसार ड जिवनसत्त्वाच्या सप्लिमेंटसबद्दलच्या मार्गदर्शक सूचना बदलल्या पाहिजेत. अ‍ॅवेनेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी ड जिवनसत्त्वासंदर्भाती ८१ संशोधनांचा अभ्यास केला. कॅल्शियम सप्लिमेंटसचा हाडांची खनिजघनता वाढणे, फ्रॅक्चरशी संबंध आहे मात्र त्यामुळे हृद्याच्या रक्तवाहिन्यांसंदर्भात त्रास निर्माण होऊ शकतात. ड जिवनसत्त्वाची औषधे फ्रॅक्चर कमी करणे, खुब्याचे फ्रॅक्चर यावर कोणताही अर्थपूर्ण असा फायदा होत नसल्याचे त्यांना समजले. अर्थात अ‍ॅवेनेल यांच्या या नव्या माहितीवर सर्वांचे एकमत झालेले नाही. जेव्हा ड जिवनसत्त्वाची पातळी कमी होते तेव्हा या औषधांची मदत होते याचे पुरावे असल्याचे मत डफी मॅके यांनी व्यक्त केले आहे.  तसेच ड जिवनसत्त्वाच्या गोळ्यांचा हाडांचे आरोग्य सुधारण्यात कोणतीही भूमिका नाही हे या संशोधनाने पटवून दिले पाहिजे असे मत न्यू यॉर्कच्या लिनक्स हिल रुग्णालयातील डॉक्टर मिनिषा सूद यांनी मांडले आहे.

Web Title: Are vitamin D Supplements helpful?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.