गॅसची समस्या काही मिनिटात दूर करतील हे घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 01:47 PM2018-08-22T13:47:24+5:302018-08-22T13:47:27+5:30

गॅसपासून सुटका मिळण्यासाठी काही घरगुती उपायही फायदेशीर आहेत. या उपायांनी तुम्हाला वेळीच आराम मिळू शकतो. 

Amazing tips to get rid of acidity and gastric problem | गॅसची समस्या काही मिनिटात दूर करतील हे घरगुती उपाय!

गॅसची समस्या काही मिनिटात दूर करतील हे घरगुती उपाय!

googlenewsNext

भलतं-सलतं खाण्यामुळे अनेकांना गॅसची समस्या होऊ लागते. ही समस्या दूर करण्यासाठी ते डॉक्टरकडे जातात. जर वेळेवर यावर उपचार घेतले नाही तर याचा अधिक त्रास होऊ शकतो. अशात गॅसपासून सुटका मिळण्यासाठी काही घरगुती उपायही फायदेशीर आहेत. या उपायांनी तुम्हाला वेळीच आराम मिळू शकतो. 

दालचीनी

दालचीनीला वंडर स्पाईसही म्हटलं जातं. दालचीनीचा वापर केवळ पदार्थांची किंवा भाज्यांची चव वाढवणे इतकाच नाही तर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीही केला जातो. गॅसची समस्या दूर करण्यासाठी दालचीनीचा उपयोग केला जाऊ शकतो. यासाठी एक चमचा दालचीनी पावडर गरम पाण्यात मिश्रित करा. तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही मधही टाकू शकता. हे पाणी प्यायल्याने तुम्हाला लगेच आराम मिळेल. 

आलं

गॅसची समस्या दूर करण्यसाठी आलं फायदेशीर आहे. यासाठी आलं, बडीशेप आणि वेलची समप्रमाणात घ्या आणि पाण्यात चांगल्याप्रकारे मिश्रीत करा. सोबतच यात एक चिमुटभर हिंगही टाका. दिवसातून दोनदा हे पाणी प्यायल्यास तुम्हाला आराम मिळेल. 

लिंबू आणि बेकिंग सोडा

लिंबू आणि बेकिंग सोडा गॅसची समस्या काही मिनिटात दूर करेल. एका लिंबाच्या रसात बेकिंग सोडा टाका आणि त्यात पाणी टाका. हे चांगल्याप्रकारे मिश्रीत करा आणि हळूहळू प्यावे. तुम्हाला हवं असेल तर एक ग्लास पाण्यात तुम्ही केवळ बेकिंग सोडा टाकूनही घेऊ शकता. 

लसूण

लसणामध्ये असलेले तत्व गॅसची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतात. पाण्यात काही लसणाच्या कळ्या उकळून घ्या. आता यात काळे मिरे पावडर आणि जिरे घाला. हे पाणी नंतर गाळून प्यावे. लवकरच याने तुम्हाला आराम मिळेल. 

हिंग

गॅसचा त्रास दूर करण्यासाठी हिंग फार फायदेशीर आहे. हे मिश्रण तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात चिमुटभर हिंग मिश्रीत करा आणि दिवसातून दोन-तीनदा प्यावे. 

बडीशेप

गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्यात बडीशेप मिश्रीत करुन प्यायल्यास लगेच आराम मिळेल. तुम्हाला हवं असेल तर बडीशेपचे पानेही खाऊ शकता. याने आराम मिळेल. 
 

Web Title: Amazing tips to get rid of acidity and gastric problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.