Alert : ​वर्कआउटनंतर कदापी करु नका ‘या’ चुका, अन्यथा..!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 05:47 AM2017-09-27T05:47:04+5:302017-09-27T11:17:04+5:30

आपल्याकडून वर्कआउटनंतर अशा काही चुका होतात ज्यामुळे आपणास फिट बॉडी मिळत नाही. आज आपण जाणून घेऊया की, वर्कआउटनंतर कोणत्या चुका करु नये.

Alert: Do not say 'these' mistakes after workout, otherwise ..! | Alert : ​वर्कआउटनंतर कदापी करु नका ‘या’ चुका, अन्यथा..!

Alert : ​वर्कआउटनंतर कदापी करु नका ‘या’ चुका, अन्यथा..!

googlenewsNext
बहुतांश लोक सेलेब्ससारखी फिट बॉडी मिळविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात, मात्र अपेक्षित लाभ मिळत नाही. विशेषत: फिट बॉडीसाठी फक्त हार्ड वर्कआउट महत्त्वाचे नसून त्यानंतर काही नियमांचे पालन करावे लागते. तरच अपेक्षित फायदा मिळू शकतो. प्रत्येक सेलेब्स तज्ज्ञ फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाने वर्कआउट करतात शिवाय तज्ज्ञ डायटिशियनचे मार्गदर्शनही ते घेतात. त्यांचा वर्कआउटनंतर परफेक्ट डायट प्लॅन ठरलेला असतो आणि ते काटेकोरपणे पालनही करतात. मात्र बहुतांश लोकांना वर्कआउटनंतर नेमक कोणते नियम पाळावेत हेच माहित नसते. आपल्याकडून वर्कआउटनंतर अशा काही चुका होतात ज्यामुळे आपणास फिट बॉडी मिळत नाही. आज आपण जाणून घेऊया की, वर्कआउटनंतर कोणत्या चुका करु नये. 

* योग्य डायटचा अभाव
वर्कआउटनंतर पौष्टिक आहार घेणे हे सकाळच्या नाश्त्याएवढेच महत्त्वाचे आहे. काही लोक एक्झरसाइजनंतर योग्य डायट घेत नाहीत, ज्यामुळे त्यांचे शरीर कमकुवत होते. यासाठी रोज जिममधून आल्यानंतर प्रोटीन शेकचे सेवन करावे. याशिवाय अंडे, फळ आणि हिरव्या भाज्यापाल्यांचा समावेश करावा.  

* उशिरा जेवण करणे  
काही लोक जिममध्ये घाम गाळल्यानंतर बºयाच उशिरापर्यंत काहीच खात नाही, मात्र अशाने शरीरास फायद्याऐवजी नुकसानच जास्त होते. एक्झरसाइजनंतर शरीरात काही पोषक तत्त्वे कमी होतात, ज्यांची भरपाई करण्यासाठी आहार घेण्याची आवश्यकता असते.   

* गोड पदार्थ सेवन न करणे  
वजन वाढू नये या भीतीने बरेच लोक गोड पदार्थांचे सेवन करणे पूर्णत: बंद करतात, मात्र शारीरिक यंत्रणा सुरळीत काम करण्यासाठी फॅटचीदेखील आवश्यकता असते. यासाठी गोड पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते.  

* आहाराचे योग्य प्रमाण  
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात बरेच लोक खूप कमी प्रमाणात आहाराचे सेवन करतात आणि काही लोक बॉडी बनविण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आहार सेवन करतात. मात्र या दोन्ही सवयी चुकीच्या आहेत. यामुळे शरीरास फायद्याऐवजी नुकसानच होते. म्हणून अपेक्षित फायद्यासाठी आहाराचे प्रमाण योग्य असावे.   

Also Read : Fitness : ​बॉडी बिल्डिंगचे हे आहेत ‘५’ मोठे गैरसमज, सर्वांना वाटतात सत्य !
                   : Fitness : ​रोज फक्त ३० मिनिट व्यायाम केल्याने मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे !

  

Web Title: Alert: Do not say 'these' mistakes after workout, otherwise ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.