पिवळा पळस फुलविणार सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:17 AM2018-03-21T00:17:14+5:302018-03-21T00:17:14+5:30

तलावांसह वनांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पर्यटनासाठी बराच वाव असला तरी येथील पर्यटनांचा विकास झालेला नाही. नैसर्गिक दृष्टया वनवैभव लाभलेल्या या जिल्ह्यात दुर्र्मिळ असलेल्या पिवळ्या पळस आढळला आहे.

Yellow Pulse Flowering Beauty | पिवळा पळस फुलविणार सौंदर्य

पिवळा पळस फुलविणार सौंदर्य

googlenewsNext
ठळक मुद्दे१२ ठिकाण झाले निश्चित : जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सर्वेक्षण, पर्यटकांना करणार आकर्षित

नरेश रहिले ।
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : तलावांसह वनांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पर्यटनासाठी बराच वाव असला तरी येथील पर्यटनांचा विकास झालेला नाही. नैसर्गिक दृष्टया वनवैभव लाभलेल्या या जिल्ह्यात दुर्र्मिळ असलेल्या पिवळ्या पळस आढळला आहे. एक-दोन ठिकाणी नव्हे तर तब्बल १२ ठिकाणी पिवळा पळस आढळला आहे. या पिवळ्या पळसाचे संवर्धन करुन जिल्ह्याचे सौदंर्य खुलविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गोंदियात पळसाच्या झाडांची लागवड करायची म्हटली तर कुणी वेड तर लागले नाही असे सहज म्हणेल. कारण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पळसाची झाडे आहेत. ही झाडे सहजरित्या जगतात. परंतु अलीकडे गोंदिया जिल्ह्यातही विदेशी झाडांची रोपटे लावण्याची जणू शर्यत लागली आहे. देशी पळसाच्या झाडांची लागवड करण्याचा आग्रही गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी धरला आहे. त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्यावर लाल पळस फुलविण्याचा चंग बांधला. यासाठी सन २०१८ च्या पावसाळ्यात जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्यावर पळसाच्या रोपट्यांचीच लागवड करण्याचा त्यांनी आग्रह धरला. यावरच समाधान न मानता दुर्र्मिळ असलेल्या पिवळ्या पळसाची शोध मोहीम त्यांनी जिल्हाभरात राबविली.जिल्हाधिकाऱ्यांनी पिवळा पळस जिल्ह्यात कुठे-कुठे आहे याची शोध मोहीम प्राथमिक शिक्षकांच्या माध्यामातून राबविली.
या मोहीमेत शिक्षकांनी ज्या गावात नोकरी करतात त्या गाव परिसरात भ्रमंती करून तसेच गावातील लोकांची विचारपूस करून पांढरा व पिवळा पळस कुठे आहे याची माहिती घेतली. यात जिल्ह्यातील आमगाव, गोरेगाव, देवरी, तिरोडा, गोंदिया व अर्जुनी-मोरगाव या सहा तालुक्यात पिवळा पळस आढळला आहे. निसर्गाचे सौंदर्य फुलविणाºया या पिवळ्या फुलांच्या दर्शनासाठी पर्यटकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पळसाची मोठ्या प्रमाणात लागवड करावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. सोबत पिवळ्या पळसाच्या संर्वधनासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. ज्या ठिकाणी पिवळा पळस आढळला त्या ठिकाणापर्यंत पर्यटक पोहचतील अशी व्यवस्था करू, त्या झाडाखाली बसण्याची सोय करण्यात येईल.पर्यकांना आकर्षीत करण्यासाठी पिवळा पळस महत्वाचा आहे.
- अभिमन्यू काळे
जिल्हाधिकारी गोंदिया.

डीपीडीसीतून पिवळ्या पळसाचे संवर्धन
पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा मानल्या जाणाºया पिवळ्या पळसाच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. या पळसाचे संवर्धन करण्यासाठी त्या पळसाच्या फांद्यांचे कलम करून त्यापासून दुसरी झाडे तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात पिवळा पळस दिसावा व गोंदिया जिल्ह्याचे नैसर्गीक सौंदर्य खुलावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या ठिकाणी आढळला पिवळा पळस
आकर्षण असलेला पिवळा पळस आमगाव तालुक्याच्या चिंताटोला, तिरोडा तालुक्यात सुकडी-डाकराम या मार्गावर बिरसी-मलपूरी या चौरस्त्यावर, बिहरिया येथील एका शेतात, मेंढा मार्गावर मलपूरी फाट्यावर, गोंदिया तालुक्यात एकोडी ते रामपूरी रस्त्याच्या बाजूला, एकोडीटोला येथील शेतात, अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या राष्टÑीय उद्यान नवेगावबांध येथील संजय कुटीच्या डाव्या बाजूला, देवरी तालुक्याच्या पालांदूर जमी येथील ढोढरा येथील शेतात, गोरेगाव तालुक्यात गोरेगाव ते चुटीया या रस्त्याच्या उजव्या बाजूला, घुमर्रा व तिल्ली मोहगाव व कन्हारटोला, निंबा तेढाजवळ आढळला.

Web Title: Yellow Pulse Flowering Beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.