तिन्ही व्यवसायातून ‘शामकला’च्या जीवनात आली झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:47 PM2017-12-31T23:47:19+5:302017-12-31T23:47:31+5:30

घरी कमावणारा एक अन् खाणारे पाच, अशा दारिद्रावस्थेत जीवन जगणाºया तिरोडा तालुक्याच्या चुरडी येथील शामकला तेजराम विठोले यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेवून लागोपाठ तीन व्यवसाय घातले.

From the three occupations, the life of Shamakala came in the light of life | तिन्ही व्यवसायातून ‘शामकला’च्या जीवनात आली झळाळी

तिन्ही व्यवसायातून ‘शामकला’च्या जीवनात आली झळाळी

Next
ठळक मुद्देभगवती स्वयंसहायता महिला बचत गट : आधी शेळीपालन, मग सेंट्रिग व आता झेरॉक्स तथा लॅमिनेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : घरी कमावणारा एक अन् खाणारे पाच, अशा दारिद्रावस्थेत जीवन जगणाºया तिरोडा तालुक्याच्या चुरडी येथील शामकला तेजराम विठोले यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेवून लागोपाठ तीन व्यवसाय घातले. या तिन्ही व्यवसायातून मुलींचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य सांभाळत त्यांनी आपल्या जीवनात संपन्नतेची झळाळी आणली.
गट म्हणजे काय असते, हे त्यांना कळत नव्हते. त्यांनी भगवती स्वयंसहायता बचत गटात प्रवेश केल्यावर गटाची मासिक बचत २० रूपये होती. तीन वर्षांनंतर १० रूपये वाढवून ३० रूपये करण्यात आली. गटाचा व्यवहार वाढत गेल्यावर सदस्यांनी अंतर्गत व्यवहार सुरू केला. सन २०११ मध्ये गटाची बचत ५० रूपये करण्यात आली.
शामकला यांना चार मुली असून पती घर बांधकामाचे काम करतात. घरी शेळ्यांचा व्यवसाय सुरू होता. त्यांना व्यवसाय वाढवायचे होते. अधिक पैसे मिळविण्यासाठी त्यांनी सहयोगिनी यांना विचारले. त्यावर त्यांनी बँक कर्जाची माहिती दिली. त्यानंतर गटातील महिलांनी बँकेच्या कर्जासाठी प्रस्ताव तयार केला. त्यांच्या गटाला एक लाख रूपयांचे कर्ज मिळाले.
यातून शामकला यांनी ५० हजार रूपयांचे कर्ज घेवून सेंट्रिंगचा व्यवसाय सुरू केला.
त्यांनी सदर संपूर्ण कर्जाची परतफेड करून आॅक्टोबर २०१५ मध्ये एक लाख २१ हजार रूपयांचा पुन्हा कर्ज घेतला. या कर्जातून त्यांनी व्यवसायात आणखी भर घातली. नंतर या कर्जाचीसुद्धा संपूर्ण परतफेड केली.
यानंतर मार्च २०१७ मध्ये आयसीआयसीआय बँकेचा दोन लाख रूपयांचा कर्ज घेतला. या पैशातून त्यांनी फेरॉक्स मशीन व लॅमिनेश घेवून नवीन व्यवसाय सुरू केला. आता कुटुंबाची परिस्थिती सावरली आहे. गटात असल्यामुळे त्यांना व्यवसायाची ओढ लागली व पैशाचीही मदत होत आहे.
चारही मुलींचे शिक्षण व आरोग्याची सोय
महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तिरोडा येथे तेजस्विनी लोकसंचाललित साधन केंद्र आहे. त्या अंतर्गत चुरडी येथे एकता ग्रामसंस्था स्थापित असून भगवती स्वयंसहायता महिला बचत गट सुरू आहे. या गटाचे एकूण सदस्य ११ असून त्यापैकीच शामकला विठोले ह्या एक आहेत. त्यांनी तिनदा कर्ज घेवून आपले व्यवसाय वाढविले. त्यातून आता त्यांच्या चारही मुुुली योग्य शिक्षण घेवत असून त्यांच्या आरोग्यकडेही लक्ष दिले जात आहे.

Web Title: From the three occupations, the life of Shamakala came in the light of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.