शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:09 PM2017-11-20T22:09:51+5:302017-11-20T22:10:16+5:30

सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर गोंदिया नगर परिषदेने शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

The survey of hawkers in the city started | शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू

शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू

Next
ठळक मुद्देगुगलची मदत घेणार : नगर परिषद लागली कामाला

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर गोंदिया नगर परिषदेने शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. हे सर्वेक्षण येत्या दीड महिन्यात पूर्ण करुन त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
फेरीवाल्यांच्या मुद्दांवरुन मुंबईत चांगलाच राडा झाला. त्यानंतर शहरांमधील फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. राज्य सरकारने संपूर्ण राज्यभरात एकाचवेळी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. हे सर्वेक्षण गुगलच्या माध्यमातून केले जाणार आहे. शहरातील कोणत्या भागात किती फेरीवाले सक्रीय आहेत. याची माहिती मिळण्यास मदत होईल. याच आधारावर नगर परिषद फेरीवाल्यांची अधिकृत यादी तयार करुन त्यांना ओळखपत्र देणार आहे. फेरीवाल्यांसाठी हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलल्या जाते. भविष्यात फेरीवाल्यांसाठी हॉकर झोन तयार करुन दिले जाण्याची शक्यता आहे. सध्यास्थितीत शहरात किती फेरीवाले आहेत याची अधिकृत माहिती नगर परिषदेकडे उपलब्ध नाही. सर्वेक्षणानंतर सायकल, मोटारसायकल, पायी हाथठेले घेरून फिरणारे किती फेरीवाले आहेत. याची माहिती नगर परिषदेला मिळणार आहे
शहर स्तरावर समिती गठित
फेरीवाल्यांसदर्भात आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मागील काही वर्षांपासून शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही याबाबत ठोस उपाय योजना सुरू करण्यात आल्या. गोंदिया नगर परिषदेत १८ नोव्हेबरला एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला मुख्याधिकारी चंदन पाटील, शहर पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे, सहायक वाहतुक पोलीस निंयत्रक संजय सिंह, नगररचना विभागाचे सलाम भाई, स्वंयसेवी संस्थेचे प्रतिनिधी अशोक बेलेकर, नगर परिषद प्रकल्प अधिकारी सुनंदा बिसेन, बनकर, महिला बचतगटाच्या बोंबार्डे, रमा मिश्रा उपस्थित होते. या बैठकीत फेरीवाल्यांच्या विकासासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष मुख्याधिकारी राहणार असून यात उपस्थितांचा सदस्यांमध्ये समावेश करण्यात आला. जेव्हा फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण होवून यादी तयार केली जाईल, तेव्हा दोन फेरीवाल्यांचा या समितीत समावेश केला जाणार आहे.

Web Title: The survey of hawkers in the city started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.