कार्यविस्तार योजनेतून पक्ष संघटनेला बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2017 01:03 AM2017-06-06T01:03:21+5:302017-06-06T01:03:21+5:30

भारतीय जनता पक्षाच्या सर्वच वर्गातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षीत करायचे आहे. कार्यविस्तार योजनेच्या माध्यमातून ...

Strengthen the party organization through the extension program | कार्यविस्तार योजनेतून पक्ष संघटनेला बळकट करा

कार्यविस्तार योजनेतून पक्ष संघटनेला बळकट करा

Next

रामदास आंबटकर : कार्यविस्तार योजनेची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारतीय जनता पक्षाच्या सर्वच वर्गातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षीत करायचे आहे. कार्यविस्तार योजनेच्या माध्यमातून विस्तारक कार्यकर्त्यांना दिवसभरातून ठरविलेल्या कामाप्रमाणे १५ दिवस कार्य करायचे आहे. सदस्यता अभियानातून ज्यांना आपण सदस्य केले आहे त्यांच्याशी भेटणे व नवीन सदस्य बनवायचे असून या माध्यमातून पक्ष संघटनेला बळकट करण्याचे कार्य करायचे आहे, असे प्रतिपादन प्रदेश सरचिटणीस व पं.दिनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ. रामदास आंबटकर यांनी केले.
आमगाव येथील फार्मसी कॉलेज मध्ये आयोजित कार्यविस्तार योजनेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेत आयोजित या बैठकीत प्रामुख्याने विस्तारक योजनेचे विदर्भ सहसंयोजक आशीष वांदिले, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, विस्तारक योजनेचे जिल्हा संयोजक माजी आमदार केशव मानकर, माजी आमदार खोमेश रहांगडाले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री रविकांत बोपचे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आंबटकर यांनी, मागील लोकसभा निवडणुकीत देशातील ८१ कोटी मतदारांपैकी ५५ कोटी मतदारांनी मतदान केले. यात १७ कोटी मते भाजपला मिळाली असून २८३ लोकसभेचे प्रतिनिधी निवडून आले. येणाऱ्या काळात या स्थितीला अधीक बळकट करण्याकरीता युवा वर्गावर मोठी जबाबदारी आहे. भाजपच्या ११ कोटी सदस्यांपैकी राज्यात एक कोटी सहा लाख सदस्य आहेत. कार्यविस्तार योजनेत सर्वानाच वेळ द्यायचे असून स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह १५ दिवस पाच राज्यांत प्रत्येकी तीन दिवस बुथवर राहणार आहेत. या काळात प्रत्येक विस्तारक कार्यकर्त्यांनी नियोजनाप्रमाणे कार्य करुन आपली दैनंदिन माहिती लिहून १५ दिवसानंतर ती जमा करावी.
यावेळी त्यांनी १५ दिवसांच्या कार्याचे नियोजन संदर्भात चर्चा करून आढावा घेतला व मार्गदर्शन केले. तसेच आजीवन सहयोग निधी संदर्भात आढावा घेतला. आशिष वांदिले व हेमंत पटले यांनीही योजनसंदर्भात मार्गदर्शन केले. संचालन जिल्हा संघटन महामंत्री अंजनकर यांनी केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Strengthen the party organization through the extension program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.