कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 09:23 PM2018-08-31T21:23:45+5:302018-08-31T21:24:31+5:30

पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात घुसून गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांनी कार्यालयात पत्रके फेकली व तोडफोड केली. यामुळे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयावरील भ्याड हल्ल्याचा निषेध आदिवासी सेवक डॉ. एन.डी. किरसान यांनी केला आहे.

Offensive attack on the office | कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध

कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात घुसून गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांनी कार्यालयात पत्रके फेकली व तोडफोड केली. यामुळे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयावरील भ्याड हल्ल्याचा निषेध आदिवासी सेवक डॉ. एन.डी. किरसान यांनी केला आहे.
आदिवासींच्या संशोधनासाठी कार्यरत असलेल्या या कार्यालयात आदिवासींच्या संशोधनासंबधी माहिती, अनेक संदर्भ पुस्तके, सर्वेक्षण, मौल्यवान पुरावे, छायाचित्रे जतन करून ठेवलेली आहेत. संशोधनाचे कार्य अविरतपणे करण्याचे काम या संस्थेने केलेले आहे. ही संस्था आदिवासींची संस्कृती व ग्रंथाचे जतन करण्याचे काम करीत आहे. ही संस्था मागील पन्नास वर्षे आदिवासींच्या संशोधनाचे कार्य करीत आहे. देशातील नामवंत संस्था म्हणून गौरविल्या गेलेली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या संस्थेचा गौरव करण्यात आलेला आहे. या संस्थेस सरकारने स्वायत्तता दिलेली आहे. आदिवासींची संस्कृती व वैशिष्टये जतन करणाऱ्या अशा संस्थांवरील हल्ला हा दुर्दैवी व निषेधार्थ आहे. या घटनेचा आम्ही संघटनेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो. सदर घटनेची पुन्हा चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिष्टमंडळात आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ सचिव डॉ. एन. डी. किरसान, माजी सभापती श्रावण राणा, माजी सभापती हिरालाल फाफणवाडे, शिवानंद फरदे, सुभाष चुलपार, आंनद चजे, मोहन राऊत, टेकेश्वर सोयाम, विजय मडावी यांचा समावेश होता.

Web Title: Offensive attack on the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.