The MP will be taken by the MP | खासदार पटेलांनी घेतला जामीन
खासदार पटेलांनी घेतला जामीन

ठळक मुद्देशेतकरी मोर्चा व रस्ता रोको : न्या. तहसीलदार यांच्यापुढे हजर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : १ जून २०१७ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चा व रस्ता रोको प्रकरणी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी (दि.९) येथील न्यायालयात जावून जामीन घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १ जून २०१७ रोजी शहरातील नेहरू चौक ते जयस्तंभ चौक दरम्यान शेतकरी मोर्चा काढला होता. पश्चात जयस्तंभ चौकात रस्ता रोको आंदोलन करून खासदार पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतली होती. आंदोलनाचे नेतृ्त्व प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. त्यामुळे कलम १३५ अंतर्गत खासदार पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेश समिती सदस्य अशोक गुप्ता, नानू मुदलीयार, नगरसेवक विजय रगडे व शहर अध्यक्ष अशोक सहारे यांच्यासह २०० कार्यकर्त्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील अन्य सहा जणांनी सुमारे एक महिनापूर्वी जामीन घेतला होता.
तर खासदार पटेल यांचे जामीन घ्यायचे होते. शिवाय सर्व सहा जणांना न्यायालयात हजर राहणे गरजेचे असल्याने खासदार पटेल यांनी शुक्रवारी (दि.९) द्वितीय सह दिवानी न्यायाधीश (क.स्तर) आ.ब.तहसीलदार यांच्यापुढे हजर होवून जामीन घेतला. याप्रसंगी त्यांच्यासह अन्य पाच जण उपस्थित होते.
खासदार पटेल यांच्यावतीने अ‍ॅड. निजाम शेख, अ‍ॅड. विनोद जानी व अ‍ॅड. अभिजीत सहारे यांनी काम बघितले. तर शैलेश पटेल यांनी खासदार पटेल यांचा जामीन घेतला. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Web Title:  The MP will be taken by the MP
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

प्रमोटेड बातम्या

गोंदिया अधिक बातम्या

‘वन बूथ-टेन यूथ’ अभियान गावागावांत पोहचवा

‘वन बूथ-टेन यूथ’ अभियान गावागावांत पोहचवा

16 hours ago

पर्यटन विकासासाठी निधी कमी पडणार नाही

पर्यटन विकासासाठी निधी कमी पडणार नाही

16 hours ago

पूर्व विदर्भातील दीड लाख शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत

पूर्व विदर्भातील दीड लाख शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत

16 hours ago

व्यावसायिक बदलानुसार विद्यार्थ्यांना धडे

व्यावसायिक बदलानुसार विद्यार्थ्यांना धडे

16 hours ago

२ कोटी ६२ लाखाने ग्राहकांची फसवणूक

२ कोटी ६२ लाखाने ग्राहकांची फसवणूक

16 hours ago

शिक्षण ही न संपणारी अखंड प्रक्रिया

शिक्षण ही न संपणारी अखंड प्रक्रिया

1 day ago