संक्रांतीनिमित्त तीळ खरेदीसाठी वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 09:56 PM2019-01-13T21:56:12+5:302019-01-13T21:56:48+5:30

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तीळाचे भाव थोडे वधारले दिसत असतानाही संक्रातीनिमित्त तीळ खेरीदासाठी बाजारात गर्दी दिसत आहे. तीळ-गुळाचे लाडू तयार करण्यासाठी तीळ-गुळाची खरेदी होत. ‘तीळ-गुळ खा व गोडगोड बोला’ ही म्हण संक्रातीसाठी प्रचलीत आहे.

Increased crowd for the purchase of sesame seeds | संक्रांतीनिमित्त तीळ खरेदीसाठी वाढली गर्दी

संक्रांतीनिमित्त तीळ खरेदीसाठी वाढली गर्दी

Next
ठळक मुद्देतीळाचे भाव वधारले : बाजारात ठिकठिकाणी लागली दुकाने

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तीळाचे भाव थोडे वधारले दिसत असतानाही संक्रातीनिमित्त तीळ खेरीदासाठी बाजारात गर्दी दिसत आहे. तीळ-गुळाचे लाडू तयार करण्यासाठी तीळ-गुळाची खरेदी होत.
‘तीळ-गुळ खा व गोडगोड बोला’ ही म्हण संक्रातीसाठी प्रचलीत आहे. बाजारात तीळ दिसताच संक्रातीची आठवण येते व डोळ्यापुढे येतात ते तिळाचे लाडू. मात्र तीळाचे भाव चांगलेच उंचावलेले राहत असल्याने तीळाचे लाडू बनवितानाही बजेटवर नजर ठेवावी लागते. मात्र मागील काही वर्षापासून तिळाचे चांगले उत्पादन होत असल्याने तीळाचे भाव स्थिर दिसून येत आहे. परिणामी महिलांना संक्रांतीत दिलासा मिळाला आहे.
संक्रात आली की तीळ-गुळ या दोन वस्तूंची खरेदी वाढते. आता मंगळवारी (दि.१५) संक्रांत आली असल्याने महिला व पुरूषांची बाजारात तीळ-गुळ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. येथे दुकानांसोबतच बाजारात रस्त्यावर दुकानी लावून तीळ विकणारे विक्रेतेही ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्या घरचे उत्पादन किंवा ग्रामीण भागातून खरेदी करून शहरात विकण्यासाठी ते दुकान लावत असल्याचे दिसते.
हाच प्रकार यंदाही बाजारात दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला दुकान लावून तीळ व गुळ विकले जात असून जागोजागी हातठेलेही दिसत आहेत. सध्या या विक्रेत्यांकडे खरेदी करणाऱ्यांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. यंदा भाव थोडे वधारले असले तरिही संबंधांच्या गोडव्यांचा हा सण असल्याने लाडू तयार करून त्यांचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठीचीही तयारी दिसत आहे.

तीळ १५० रूपयांपासून
गोंदियाच्या बाजारात सध्या पांढरे व काळ््या दान्याचे तीळ विक्रीला आले आहे. यात पांढरे तीळ १८० रूपये तर काळ््या दान्याचे तीळ १५० रूपये किलो दराने विकले जात आहे. शिवाय ५०-६० रूपये किलो दराने गुळ विकला जात आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही तिळाचे दर २०-३० रूपये कमी होते अशी माहिती आहे. यंदा थोडे फार भाव वधारले असले तरिही वर्षातून एकदाच सण येत असल्याने तीळ-गुळ खरेदी सुरूच आहे.
रेडिमेड पपडीही उपलब्ध
आजच्या युगात प्रत्येकच वस्तू किंवा पदार्थ रेडीमेड उपलब्ध असतानाच बाजारात तिळाची पपडीही रेडीमेड विकली जात आहे. धकाधकीच्या जीवनाच तिळ खरेदी करून त्याचे लाडू व पपडी तयार करण्यासाठी नोकरदार महिलांकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे त्यांचा कल रेडीमेड पपडीकडे असतो. नेमकी बाब हेरून बाजारात रेडीमेड पपडी उपलब्ध करण्यात आली आहे.

Web Title: Increased crowd for the purchase of sesame seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.