ंआघाडी सरकार सत्तेवर आल्यास गरजूंना दरमहा ६ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:56 PM2019-04-02T23:56:51+5:302019-04-02T23:57:33+5:30

मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रूपये व दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारला या आश्वासनांचा विसर पडला.

If the government comes to power, then the support of 6,000 people per month is needed | ंआघाडी सरकार सत्तेवर आल्यास गरजूंना दरमहा ६ हजारांची मदत

ंआघाडी सरकार सत्तेवर आल्यास गरजूंना दरमहा ६ हजारांची मदत

Next
ठळक मुद्देगोंदिया तालुक्यात आमदार अग्रवाल यांच्या प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रूपये व दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारला या आश्वासनांचा विसर पडला. तर राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होताच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन दिलेले आश्वासन पूर्ण केले. आघाडी सरकार सत्तेत आल्यास गरजूंना दरमहा ६ हजारांची आर्थिक मदत देण्याचे राहुल गांधी यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करु, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.
कॉँग्रेस-राष्ट्रवादी व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील लोहारा, निलागोंदी, सोनपुरी, नवेगाव, बलमाटोला, निलज, लोधीटोला, अंभोरा, बटाना, हलबीटोला, चांदनीटोला, गोंडीटोला, भागवतटोला येथे आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, विमल नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, गेंदलाल शरणागत, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, देवराव मसे, भागेश बिजेवार, व्यंकट मेश्राम, जगतराय बिसेन, ईश्वर पटले, चिंतामन चौधरी, टेकचंद सिहारे, धम्मानंद मेश्राम, धनलाल ठाकरे व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. पुढे बोलताना अग्रवाल यांनी, जनसंघर्ष यात्रेची दखल घेत भाजप सरकारने राज्यात शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची घोषणा केली. मात्र यामध्ये सरकारने लावलेल्या अटी-शर्तींमुळे अर्ध्या शेतकऱ्यांचीही कर्जमाफीचा माफीचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप केला.एकीकडे, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात धानाला २५०० रूपये भाव हमीभाव दिला जात आहे. तर राज्यात १७५० रूपये भाव देऊन शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला.
भापजच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे देशातील शेतकरी बेहाल झाला आहे. त्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड प्रमाणेच आता केंद्रातूनही भाजपला निरोप देण्याची वेळ आली असल्याचेही आमदार अग्रवाल म्हणाले.

Web Title: If the government comes to power, then the support of 6,000 people per month is needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.