धानाला योग्य भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 09:59 PM2018-10-07T21:59:30+5:302018-10-07T22:00:56+5:30

धानाला योग्य भाव देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी तिरोडा येथील शेतकरी सेवा समितीच्यावतीने नरेंद्र रहांगडाले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

Give good value to money | धानाला योग्य भाव द्या

धानाला योग्य भाव द्या

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी सेवा समितीची मागणी : मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गुलाबटोला : धानाला योग्य भाव देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी तिरोडा येथील शेतकरी सेवा समितीच्यावतीने नरेंद्र रहांगडाले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात, शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी येण्यासाठी शासनाने रोवणी आणि धान कापणी रोजगार हमी योजनेंतर्गत करावी, वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानाची भरपाई त्वरित देण्यात यावी, धानाला योग्य भाव देण्यात यावा, कृषी योजना शासनाने पुढाकार घेवून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी स्विकारावी, विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, नवीन कर्ज देण्यात यावे, सातबारा विना मुल्य देण्यात यावा, सर्वच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतकºयांना १२ महिने पाण्याची सोय करावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी आदि मागण्या नमूद आहेत.
शेतकरी सेवा समितीच्या वतीने या मागण्यांचे निवेद तहसीलदारांमार्पत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. शिष्टमंडळात राजकुमार ठाकरे, भरत रहांगडाले, निमिद पटले, प्रेमलाल पारधी, धनलाल पटले, राजकुमार नेरकर, उमेश बिसेन, बाळासाहेब पारधी, राजेश रहांगडाले, जितेंद्र पारधी, सहेसराम पटले, रजतन चचाने, मिलिंद पारधी, लखन रहांगडाले आदींचा समावेश होता.

Web Title: Give good value to money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.