मदतीसाठी शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट पाहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 09:01 PM2018-04-22T21:01:59+5:302018-04-22T21:01:59+5:30

शेतकरी मेल्यानंतर त्यांना दोन लाखांची मदत देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी येतात. परंतु त्या शेतकऱ्याने काबाडकष्ट करून पिकविलेल्या मालाला योग्य भाव देत नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव न देता त्याला कर्जाच्या खाईत जातपर्यंत कवडीची मदत करीत नाही.

Do not wait for farmers' death for help | मदतीसाठी शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट पाहू नका

मदतीसाठी शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट पाहू नका

Next
ठळक मुद्देनाना पटोले यांचे प्रतिपादन : खमारी येथे कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकरी मेल्यानंतर त्यांना दोन लाखांची मदत देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी येतात. परंतु त्या शेतकऱ्याने काबाडकष्ट करून पिकविलेल्या मालाला योग्य भाव देत नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव न देता त्याला कर्जाच्या खाईत जातपर्यंत कवडीची मदत करीत नाही. त्यांच्या कामाची किंमत मृत्यूनंतर करण्यापेक्षा आधीच मदत का करीत नाही. म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या मरण्याची वाट पाहते का? असा सवाल माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे.
गोंदिया जिल्हा कुणबी जनकल्याण संस्था खमारीतर्फे कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात ते पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रा. अर्जुन बुध्दे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपालदास अग्रवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, माजी जि.प. उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, पत्रकार नरेश रहिले, बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राचे विजय बहेकार, प्राचार्य कमलबापू बहेकार, नगरसेविका भावना कदम, सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र फुंडे, छत्तीसगडच्या रायपूर येथील कुणबी समाजाचे अध्यक्ष एस.एस. ब्राम्हणकर, आमगाव येथील कुणबी समाजाचे संघटक बुधराम हत्तीमारे, पं.स. सदस्य मार्तंडराव बहेकार, काशिराम शिवणकर, चंद्रकुमार बहेकार, महादेव मेंढे, कैलाश साखरे, अमर वऱ्हाडे व इतर समाजबांधव उपस्थित होते.
माजी खा. पटोले यांनी, सामूहिक विवाहात लग्न करणाºया जोडप्यांना आधी तालुकास्तरावर तहसील कार्यालयाच्या मार्फत लाभ देण्यात येत असल्याने सामूहिक विवाहात लग्न करणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढली. परंतु शासनाने ही मदत देण्यासाठी अनेक जाचक अटी घातल्यामुळे आता लोकांनी सामूहिक विवाहाकडे पाठ फिरविली आहे. सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे. समाजबांधवांनी वेळ व पैशाची बचत करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यातच लग्न करावे अस मत व्यक्त केले.
या वेळी नरेश रहिले, प्राचार्य कमलबापू बहेकार, विजय शिवणकर आ. गोपालदास अग्रवाल, माजी खा. नाना पटोले व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अर्जुन बुध्दे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरूवात संत शिरोमणी तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व गणपतीच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.
या वेळी मार्गदर्शन करताना आ. गोपालदास अग्रवाल यांनी, समाज संघटीत राहावा असे सांगितले. प्राचार्य कमलबापू बेहकार यांनी पीक विम्यातील दोष सांगितले. मागच्या वर्षी पावसाअभावी लागवड न झालेल्या उत्पन्न देणाऱ्या शेतीला तलाठ्यांकडून पडीक दाखविण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याला आणखीच अडचणीत आणले आहे, असे सांगितले.
प्रास्ताविक अध्यक्ष बुधराम चुटे यांनी मांडले. संचालन प्रा. गजानन तरोणे यांनी केले. आभार नगरसेविका भावना कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी संख्याध्यक्ष बुधराम चुटे, सचिव आत्माराम कोरे, चिमनलाल मेंढे, सदाशिव भांडारकर, पुरन तावाडे, राजाराम तरोणे, लिखीराम मुनेश्वर, राजू मेंढे, महेंद्र मेंढे, भगवती चुटे, कल्पना पाथोडे, हुकूमता राखडे, संतोष हत्तीमारे, देवा तावाडे, अनिल भांडारकर, विष्णू भांडारकर, संतोष मेंढे, रविंद्र हत्तीमारे, रंजीत गायधने, रवी हत्तीमारे, तुळशीराम मेंढे, सुशील तावाडे गज्जू मेंढे, श्याम तावाडे, महेश भांडारकर, कमलेश तावाडे, गोवर्धन भांडारकर, सशभाष तरोणे, रूपेश मेंढे, सुनिल तावाडे, सोनू तावाडे, संतोष भांडारकर, राध्येश्याम गायधने, शकुन हत्तीमारे, आशा शिवणकर ललीता बागडे, कल्पना बागडे यांनी सहकार्य केले.
पाच जोडपी विवाहबद्ध
गोंदिया जिल्हा कुणबी जनकल्याण संस्था खमारीतर्फे आयोजित कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात पाच जोडप्यांचा विवाह करण्यात आला. मंगलाष्टके आमगाव येथील भरत चुटे यांनी गायिली. या सोहळ्यातील जोडप्यांना माजी खा. नाना पटोले यांनी आशीर्वाद दिले.

Web Title: Do not wait for farmers' death for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.