स्वच्छतेसाठी जिल्ह्याला ९१ लाखांचे पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:10 PM2019-01-13T22:10:47+5:302019-01-13T22:11:18+5:30

स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहचविण्यासाठी व स्वच्छतेसंदर्भात लोकचळवळ उभी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता प्रत्येक ग्रामपंचायत मधील एका वॉर्डाला हमखास पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता प्रत्येक गावातील प्रत्येक वॉर्ड पुरस्कार घेण्यासाठी स्वच्छता मोहिमेला जोमाने राबविणार आहेत.

District receives Rs.91 lakh for cleanliness | स्वच्छतेसाठी जिल्ह्याला ९१ लाखांचे पुरस्कार

स्वच्छतेसाठी जिल्ह्याला ९१ लाखांचे पुरस्कार

Next
ठळक मुद्दे५३ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० हजार : ५४६ वॉर्डांना १० हजारांचा पुरस्कार

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहचविण्यासाठी व स्वच्छतेसंदर्भात लोकचळवळ उभी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता प्रत्येक ग्रामपंचायत मधील एका वॉर्डाला हमखास पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता प्रत्येक गावातील प्रत्येक वॉर्ड पुरस्कार घेण्यासाठी स्वच्छता मोहिमेला जोमाने राबविणार आहेत. स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे. प्रत्येक वॉर्डाला १० हजार प्रमाणे जिल्ह्यातील ५४६ वॉर्डांना ५४ लाख ६० हजार, प्रत्येक जि.प. क्षेत्राला एक पुरस्कार अशा ५३ जिल्हा परिषद क्षेत्रांसाठी २६ लाख ५० हजार, जिल्हास्तरीय प्रथम ५ लाख, द्वितीय ३ लाख व तृतीय २ लाख असे एकूण ९१ लाख १० हजार रूपये स्वच्छतेचे बक्षीस म्हणून गोंदिया जिल्ह्याला दिले जाणार आहेत.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्टÑसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा शासन राबवित आहे. शासनाने या संत गाडगेबाबा मोहिमेला वृद्धींगत करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये स्वच्छतेची स्पर्धा सुरू केली आहे. ग्रामपंचायतच्या प्रत्येक वॉर्डाची तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर १ ते ३१ डिसेंबर २०१८ या महिनाभरात जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींचे १ हजार ९२२ वॉर्ड या स्पर्धेत सहभागी झाले. यात प्रत्येक ग्रामपंचायतच्या एका वॉर्डाला १० हजारांचा हमखास पुरस्कार दिला जाणार आहे.
आमगाव तालुक्यातील ६ जि.प. क्षेत्रातील ५७ ग्रामपंचायत असून १७३ वॉर्ड आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७ जि.प. क्षेत्रातील ७० ग्रामपंचायत असून २३२ वॉर्ड आहेत. देवरी तालुक्यात ५ जि.प. क्षेत्रातील ५७ ग्रामपंचायत असून १६७ वॉर्ड आहेत. गोंदिया तालुक्यात १४ जि.प. क्षेत्रातील १०९ ग्रामपंचायत असून ३५७ वॉर्ड आहेत. गोरेगाव तालुक्यात ५ जि.प. क्षेत्रातील ५५ ग्रामपंचायत असून १७४ वॉर्ड आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ५ जि.प. क्षेत्रातील ६३ ग्रामपंचायत असून १९४ वॉर्ड आहेत. सालेकसा तालुक्यात ४ जि.प. क्षेत्रातील ४१ ग्रामपंचायत असून ३३५ वॉर्ड आहेत. तिरोडा तालुक्यात ७ जि.प. क्षेत्रातील ९५ ग्रामपंचायत असून २९० वॉर्ड आहेत.
अशाप्रकारे जिल्ह्यातील ५३ जिल्हापरिषद क्षेत्रातील ५४५ ग्रामपंचायतच्या १ हजार ९२२ वॉर्डांच्या सर्वेक्षणानंतर जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत ग्रामपंचायतचे सर्वेक्षण करण्यात आले. त्या प्रत्येक जिल्ह परिषद अंतर्गत स्वच्छ ग्राम पंचायत म्हणून पुढे येणाऱ्या ग्रामपंचायतला ५० हजारांचा हमखास पुरस्कार दिला जाणार आहे. प्रभाग स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक एकता या अनुशंगाने प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन वॉर्डावार्डांंत करण्यात आले. स्पर्धेत सहभागी ज्या प्रभागात मागील ५ वर्षात एकही धार्मिक, जाातिय दंगल किंवा तेढ निर्माण झाली नसेल अशा वॉर्डाला पुरस्कार देण्यात येत आहे. शासनाने ठरविलेल्या १०० गुणांपैकी सर्वाधीक गुण घेणाऱ्या वॉर्डाला पुरस्कार दिला जात आहे.
या मुद्यांवर झाले सर्वेक्षण
स्वच्छतेसोबतच प्रभाग पाणीपट्टी वसुली, प्रभागातील कुुटुंबांकडील शौचालयांची संख्या, शौचालयांचा वापर, घनकचरा व्यवस्थापन, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन, लोकसहभाग, प्रभागातील रस्ते, गल्ल्या, घरासमोरील अंगण, परसदारे यांची रचना, स्वच्छता, सजावट, गाव परिसरतील फुलझाडे, वृक्षसंवर्धन, घराच्या कुंपनभिंतींचे सुशोभिकरण, प्रभागातील मुले-मुली, नागरिक यांची नखे, केस गणवेश, कपडे, आंघोळ, मलमूत्र, विसर्जन, हात धुण्याच्या सवयी निटनेटक्या असलेल्यांना गुण देण्यात आले. लोकसहभागातून शाळा, रस्ते व जलसंधारणाची कामे केल्यास त्यावरही गुण देण्यात आले.

जे वॉर्ड स्वच्छता पुरस्काराचा मानकरी ठरेल अशा वॉर्डातील लोकांना ‘आम्ही स्वच्छ वॉर्डाचे नागरिक आहोत’ असे ओळखपत्र दिले जाणार आहे. स्वच्छतेसंदर्भात लोकचळवळ उभी व्हावी यासाठी फक्त गोंदिया जिल्ह्यातच ९१ लाखांचे पुरस्कार दिले जात आहे.
-राजेश राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता.

Web Title: District receives Rs.91 lakh for cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.