विविध कामांची केली प्रत्यक्ष पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:50 AM2018-08-06T00:50:39+5:302018-08-06T00:51:02+5:30

तालुक्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार, भातखाचर व सेंद्रीय शेती व वृक्षारोपण अशा विविध कामांचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.४) प्रत्यक्ष पाहणी केली. तर सोबतच निवडणूक कार्यक्रमाला घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.

Conducted various works | विविध कामांची केली प्रत्यक्ष पाहणी

विविध कामांची केली प्रत्यक्ष पाहणी

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा : निवडणूक कामांवर केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : तालुक्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार, भातखाचर व सेंद्रीय शेती व वृक्षारोपण अशा विविध कामांचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.४) प्रत्यक्ष पाहणी केली. तर सोबतच निवडणूक कार्यक्रमाला घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी तिरोडा येथे शनिवारी (दि.४) भेट दिली. या भेटीत त्यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ग्राम पालडोंगरी येथे तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्याची पाहणी केली. तसेच ग्राम करटी येथील भातखाचरांची प्रत्यक्ष पाहणी केली. एवढेच नव्हे तर ग्राम बिहीरीया येथील कॅटल शेड, सेंद्रीय शेती व वृक्षारोपणाची माहिती जाणून घेत पाहणी केली.
तालुक्यात विविध योजनांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी बलकवडे यांनी निवडणूक कामांबाबत बीएलओ व त्यांच्या पर्यवेक्षकांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी त्यांनी बीएलओ म्हणून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील, नगर परिषद कर्मचारी आदिंना मार्गदर्शन केले. सन २०१९ मध्ये येत असलेल्या लोकसभा निवडणुकांना घेऊन मतदार याद्या अद्ययावत करण्याचे हे काम सुरू आहे. यात स्थलांतरीत झालेले, मरण पावलेले, दोनदा नाव असलेले मतदार अशांची यादी अद्ययावर करून नवीन मतदारांची यादी तयार करून १ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. तसेच सध्या मतदार यादीत असलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो बदलून कलर फोटोंचा त्यात वापर केला जाणार असल्याचेही सांगीतले.
आढावा बैठकीला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शुभांगी आंधळे, उप विभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे, तहसीलदार संजय रामटेके, खंड विकास अधिकारी देवेंद्र हरिणखेडे, तालुका कृषी अधिकारी एम.ए.वावधने, उप अभियंता अनंत जगताप प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीसाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी, आशा वर्कर, पोलीस पाटील, नगर परिषद कर्मचारी, कृषी कर्मचारी व अंगणवाडी सेविकांनी सहकार्य केले.

Web Title: Conducted various works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.