दुसºया दिवशीही बस सेवा ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:12 AM2017-10-19T00:12:12+5:302017-10-19T00:12:24+5:30

Bus service on second day | दुसºया दिवशीही बस सेवा ठप्पच

दुसºया दिवशीही बस सेवा ठप्पच

Next
ठळक मुद्देएसटी कर्मचाºयांचे आंदोलन सुरूच : दिवाळीच्या दिवासातच प्रवाशांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी बुधवार (दि.१७) दुसºया दिवशीसुद्धा संपावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गोंदिया आणि तिरोडा या दोन्ही आगारातील बस सेवा पूर्णपणे ठप्प पडली आहे. दिवाळीच्या सुट्यामुळे सध्या बाहेरगावी जाणाºयांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र याच दरम्यान एस.टी.कर्मचाºयांचा संप असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.
विविध मागण्यांसाठी एस.टी.कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर आहेत. गोंदिया आणि तिरोडा आगारातील आगारातील चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाºयांची बेमुदत संप पुकारल्याने दोन्ही आगारातील बससेवा दुसºया दिवशीसुद्धा १०० टक्के ठप्प होती. ज्या प्रवाशांना एसटी कर्मचाºयांच्या संपाबाबत माहिती नव्हते, त्यांनी प्रवासासाठी बस स्थानक गाठले. मात्र तिथे पोहचल्यानंतर संप असल्याचे कळताच त्यांची तारांबळ उडाली. शेवटी मिळेल त्या वाहनाने गावी जावे लागले.
बुधवारी दिवशी एसटी कामगारांच्या संपाची माहिती मिळताच प्रवाशांनी आपला मोर्चा खासगी प्रवाशी वाहनांकडे वळविल्याचे चित्र होते. तर काही प्रवाशांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. ऐन दिवाळीच्या हंगामात एसटी कामगारांनी संप पुरकारल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एस.टी.कर्मचाºयांनी सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग मिळावा, सुधारित वेतनश्रेणी व करावयाची वेतन निश्चिती, सेवा सवलती व विविध भत्ते या मागण्यांसाठी राज्यभरातील ९९ टक्के एसटी कामगार सहभागी झाले आहेत.
त्यातच गोंदिया व तिरोडा आगारातील सर्वच कामगार संपावर असल्याने जिल्ह्यातील वाहतूक सेवा ठप्प आहे.
कर्मचाºयांच्या मागण्या अद्यापही पूर्ण न झाल्याने संप सुरूच आहे. तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहील, असा पवित्र कामगारांनी घेतल्याचे संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले आहे.
या आहेत मुख्य मागण्या
महाराष्टÑ एसटी वर्कर्स काँग्रेसच्या (इंटक) पदाधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी कर व मोटार वाहन कर इतर राज्यापेक्षा महाराष्टÑ राज्यात सर्वाधिक आहे, गुजरात शासनाने प्रवासी कराचे दर कमी करून ते ७.५ टक्के केले आहे. महाराष्टÑातील साध्या बसवरील १७.५ टक्के प्रवासी करामुळे खासगी व अनधिकृत वाहतुकीला तोंड देणे कठिण जात आहे. साधी, निमआराम व वाताणुकुलित व्होल्वो या तिन्ही प्रकारात महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाचे प्रती प्रवासी किमी मागील भाडे इतर महामंडळाच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्याचा देखील परिणाम होत आहे.
खासगी वाहतुकीला सुगीचे दिवस
एसटी कामगारांच्या संपाचा चांगलाच लाभ खासगी वाहतूक धारकांना मिळत असल्याचे दिसून आले. ३० ते ६० किमीपर्यंतचा प्रवास काळी-पिवळीने केला जात आहे. काळी-पिवळी वाहन चालक जनावरांप्रमाणे प्रवाशांना वाहून नेत आहेत. नऊ प्रवासी क्षमता असलेल्या वाहनांमध्ये १५ ते २० जणांना कोंबून नेले जात आहे. दिवाळी असल्याने व कामगार संपामुळे प्रवासी खासगी वाहने अपुरी पडत आहेत. मात्र प्रवासीसुद्धा धोका पत्करून खासगी वाहनांतून प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
चार दिवस धावणार विशेष ट्रेन
गोंदिया ते इतवारी : प्रवाशांसाठी सुविधा

गोंदिया : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांच्या संपामुळे राज्याची लोकवाहिनी असलेली एसटीची प्रवासी सेवा ठप्प झाली आहे. दिवाळीची गर्दी सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. एसटीचा संप व दिवाळीची गर्दी पाहता प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी विशेष पुढाकार घेवून गोंदिया ते इतवारी (नागपूर) व इतवारी ते नागपूर या दरम्यान विशेष ट्रेनची व्यवस्था १८ ते २१ आॅक्टोबर दरम्यान केली आहे. या विशेष ट्रेनला ६ जनरल कोच व २ शयनयान कोच राहणार आहे. ही विशेष ट्रेन १८ तारखेला सायंकाळी ४.३० वाजता गोंदियावरु न सुटेल व इतवारीला रात्री ८.३० वाजता पोहोचेल. १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता निघून दुपारी १ वाजता गोंदियाला पोहचेल व गोंदिया येथून त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता निघून इतवारीला रात्री ८.३० वाजता पोहचेल. २० आॅक्टोबर रोजी इतवारी येथून सकाळी ८.३० वाजता निघून गोंदिया येथे दुपारी १ वाजता पोहचेल. त्याच दिवशी गोंदिया येथून दुपारी ४.३० वाजता निघून इतवारी येथे रात्री ८.३० वाजता पोहचेल. २१ आॅक्टोबर रोजी इतवारी येथून सकाळी ८.३० वाजता निघून दुपारी १ वाजता पोहचणार आहे. ही विशेष ट्रेन चार दिवस निश्चित वेळी सर्वच रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
एसटी बंदचा रेल्वेला लाभ
एसटी कामगारांनी दिवाळीच्या हंगामातच संप पुकारल्याने आता रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. एक्स्प्रेस व सुपरफास्ट गाड्यांच्या जनरल डब्यात तर पाय ठेवायलासुद्धा जागा नसल्याचे चित्र आहे. अशीच स्थिती आरक्षित डब्यांचीही झाली आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर बुधवारी पोहोचलेल्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये तर प्रवाशांची अलोट गर्दी होती. आरक्षित बोगीतही सामान्य तिकिट धारकांनी प्रवास केला. सामान्य डब्यातील गर्दीतून प्रवास करण्यापेक्षा रेल्वे कर्मचाºयांनी केलेला दंड भरून आरक्षित बोगीतून प्रवास करणे प्रवाशांनी पसंत केले. पॅसेंजर गाड्यांचे सर्वच डब्बे हाऊसफुल्ल होत आहेत. एसटी बंदमुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठीच गर्दी आढळली.

एस.टी.कर्मचाºयांनी त्यांच्या मागण्यासाठी केलेले आंदोलन योग्य असले तरी त्यांनी ऐन दिवाळीच्या काळात संप केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांनी मानवी दृष्टीकोनातून दिवाळीच्या काळात संप मागे घेण्याची गरज आहे. या संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागील प्रवाशांना बसत आहे.
- कैलास पटले, जि.प.सदस्य.

Web Title: Bus service on second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.