सर्वाधिक ग्राम पंचायतींवर भाजपाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:53 PM2017-10-17T23:53:08+5:302017-10-17T23:53:18+5:30

जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी निवडणूक पार पडली. तर मंगळवारी (दि.१७) मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले.

 BJP's claim on most Gram Panchayats | सर्वाधिक ग्राम पंचायतींवर भाजपाचा दावा

सर्वाधिक ग्राम पंचायतींवर भाजपाचा दावा

Next
ठळक मुद्देआमगाव, सडक -अर्जुनीत राष्टÑवादी : सरपंच पदासाठी झाली चुरस, समर्थकांचा जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी निवडणूक पार पडली. तर मंगळवारी (दि.१७) मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. यात ३४१ ग्रामपंचायतींपैकी ६० ते ६५ टक्के ग्रामपंचायतींवर भाजपा समर्थीत उमेदवार विजयी झाले. मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या बाजुने कौल दिल्याने दोन तालुके वगळता इतर तालुक्यात भाजपाने मुसंडी मारल्याचे चित्र आहे.
निवडणूक विभागाने जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला होता. यापैकी तीन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. तर तीन ग्रामपंचायतीची निवडणूक गावकºयांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक विभागाने रद्द केली. त्यामुळे सोमवारी जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले.
या निवडणुकीत ८५.५८ टक्के मतदान झाले. यात जिल्ह्यातील एकूण ३ लाख ८२ हजार ८०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. १ लाख ९३ हजार ७२ महिला मतदारांनी तर १ लाख ८९ हजार ९०९ पुरूष मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. ३४७ सरपंचपदासाठी एकूण १ हजार ५८ उमेदवार तर ३ हजार २३ सदस्य पदासाठी ५ हजार ८१८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी ८ सरपंच व ३१३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे उर्वरित पदासाठी निवडणूक घेण्यात आली. मंगळवारी सकाळी ८ वाजतापासूनच सर्वच तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात मतमोजणीची करण्यात आली. काही ठिकाणी सुरूवातीपासूनच भाजपा समर्थीत उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र होते. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने सर्वांचे लक्ष सरपंच पदाच्या उमेदवाराकडे लागले होते.
निकाल ऐकण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली होती. जसे जसे निकाल जाहीर होत होते. तस तसा समर्थकांचा जल्लोष होत होता. ही निवडणूक कुठल्या पक्ष्याच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी सर्व राजकीय पक्ष पडद्याआड उमेदवारांना समर्थन देतात.
दरम्यान वाढती महागाई, नोटबंदी, दुष्काळ, कर्जमाफी या मुद्दावरुन ग्रामीण भागात सरकार विरोध रोष असल्याची चर्चा होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्या बाजुने कौल दिल्याने हे मुद्दे गौण ठरले.
सडक-अर्जुनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व अर्जुनी-मोरगाव येथे १८ सरपंच पदाचे उमेदवार निवडून आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे. दरम्यान गोंदिया तालुक्यातील विजयी उमेदवारांच्या संख्येवरुन भाजप व काँग्रेसने सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याचा दावा केला.
काही ठिकाणी मतमोजणीला उशिराने सुरुवात
देवरी मतदार संघातील केशोरी येथील मतदान यंत्रामध्ये बिघाड आल्याने मतमोजणीची प्रक्रिया काहीवेळ बंद होती. त्यामुळे मतमोजणीे विलंब झाल्याने काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मशीनमधील बिघाड दुरूस्त करुन मतमोजणीला पुन्हा सुरूवात करण्यात आली.

सरकारच्या अकार्यक्षमतेचा पराभव
ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय हा सर्व कार्यकर्त्यांचा आहे. सरकारच्या अकार्यक्षमतेप्रती ग्रामीण जनतेची संप्तत प्रतिक्रीया आहे. सरकार राज्यातील शेतकरी, लघु उद्योग, व्यापारी व जनतेसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाºया भाजपाचा सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. वाढती महागाई, पेट्रोलचे वाढते दर, शेत मालाला योग्य भाव नाही त्यामुळे जनता त्रस्त झाली. त्यामुळेच मतदारांनी काँग्रेसच्या बाजुने कौल दिला आहे.
- आमदार गोपालदास अग्रवाल
कार्यकर्ता व जनतेचा विजय
ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय हा कार्यकर्ता व जनतेचा विजय आहे. प्रधानंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर व त्यांनी केलेल्या कामांवर जनतेने विश्वास ठेवून भापजला विजयी केले. विरोधकांच्या खोट्या आश्वासनांना जनता ओळखू लागली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचाच उमेदवार निवडून येणार.
-विनोद अग्रवाल, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष

Web Title:  BJP's claim on most Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.