बाई गंगाबाई महिला रुग्णालयात पाण्याची समस्या कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 10:09 PM2018-02-01T22:09:12+5:302018-02-01T22:09:52+5:30
नादुरूस्त बोअरवेलमुळे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात (बीजीडब्ल्यू) पाण्याची समस्या कायम आहे. मागील सहा महिन्यांपासून यावर तोडगा काढण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले नसून रुग्णांच्या नातेवाईकांची पाण्यासाठी भटकंती कायम असल्याचे चित्र आहे.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : नादुरूस्त बोअरवेलमुळे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात (बीजीडब्ल्यू) पाण्याची समस्या कायम आहे. मागील सहा महिन्यांपासून यावर तोडगा काढण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले नसून रुग्णांच्या नातेवाईकांची पाण्यासाठी भटकंती कायम असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील एकमेव शासकीय महिला व बालरुग्णालय असलेले बीजीडब्ल्यू रुग्णालय नेहमीच विविध कारणांनी प्रसिध्दीत असते. सध्या हे रुग्णालय पाण्याच्या समस्येंने चर्चेत आहे.
या रुग्णालयात दररोज शेकडो महिला उपचारासाठी येतात. मात्र मागील सहा महिन्यापासून रुग्णालयाला पाणी पुरवठा होणाºया दोन बोअरवेलमध्ये बिघाड आल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी बोअरवेलची दुरूस्ती करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा तीच समस्या निर्माण झाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची पाण्यासाठी भटकंती कायम आहे. या रुग्णालयात पाणी साठवून ठेवण्यासाठी पाणी टाकीची योग्य व्यवस्था नसल्याने ही समस्या वांरवार निर्माण होत असल्याची माहिती आहे. रुग्णालय प्रशासनाने पाणी टाकी तयार करण्यासाठी एक प्रस्ताव तयार करुन तयार केला असून तो जिल्हा नियोजन समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. या प्रस्तावात ६० हजार लिटरची भूमिगत पाणी टाकी व १५ हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी रुग्णालयाच्या इमारतीवर तयार करण्याची मागणी केली आहे.
हा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकाºयांना देण्यात येणार आहे. रुग्णालयातील पाण्याचा प्रश्न गंभीर असताना व त्यावर नेमकी कुठली उपाय योजना करण्याची गरज आहे हे माहिती असताना सुध्दा रुगालय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची पाण्यासाठी रुग्णालयाच्या बाहेर भटकंती कायम आहे. हा प्रस्ताव सादर केल्यानंतर प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचे प्रशासकीय कामकाज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या अतंर्गत येते. या रुग्णालयातील पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी अधिष्ठाता अपूर्व पावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांना बैठकीसाठी बोलविले होते. या बैठकीत त्यांच्यासोबत पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. त्यात पाणी टाकी तयार करण्याचा मुद्दा पुढे आला.रुग्णालयाच्या इमारतीवर १५ हजार लिटर क्षमतेच्या पाणी टाकीचे काम सुरू करण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले होते. मात्र पंधरा दिवसांनंतरही या विभागाकडूून कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळेच हा प्रस्ताव आता जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येणार आहे.
६० हजार आणि १५ हजार लिटरच्या दोन पाणी टाकी तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात येईल. याच प्रश्नावर जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित केली आहे. त्यात हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
- डॉ. अमरीश मोहबे,
वैद्यकीय अधीक्षक बीजीडब्ल्यू.