पुनर्वसन पॅकेजला मंजूरी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:01 PM2017-09-16T22:01:14+5:302017-09-16T22:01:28+5:30

सन २००६ नंतर नशिबाने जिल्ह्यात पूर आला नाही. अन्यथा किन्ही-कासा व कटंगटोला या गावांतील शेकडो कुटुंब धोक्यात आले असते. मात्र बाघ नदी कधी पुराच्या स्थितीत आल्यास मोठा दुर्घटना घडू शकते.

 Approved the rehab package | पुनर्वसन पॅकेजला मंजूरी द्या

पुनर्वसन पॅकेजला मंजूरी द्या

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : किन्ही-कासा-कटंगटोलासाठी विशेष बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सन २००६ नंतर नशिबाने जिल्ह्यात पूर आला नाही. अन्यथा किन्ही-कासा व कटंगटोला या गावांतील शेकडो कुटुंब धोक्यात आले असते. मात्र बाघ नदी कधी पुराच्या स्थितीत आल्यास मोठा दुर्घटना घडू शकते. त्यामुळे किन्ही-कासा व कटंगटोला या गावांच्या पुनर्वसनाला प्राधान्याने मंजूरी द्या अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे केलीे.
ग्राम कान्ही-कासा-कटंगटोलाच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या कारवाईच्या माहितीसाठी आमदार अग्रवाल यांनी मंत्रालयात विशेष आढावा बैठक बोलाविली होती. यावेळी त्यांनी ही मागणी लावून धरली. राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव मेघा गाडगीळ, वित्त सचिव बी.के.जैन यांच्यासह संबंधीत अधिकाºयांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. या तिन्ही गावांच्या पुनर्वसनाच्या कामातील दिंरगाईवर आमदार अग्रवाल यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच पुनर्वसनाच्या कामात चालढकलपणा करणाºयावर कारवाई करुन कामाला गती देण्याची मागणी केली.
याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, कासा व कटंगटोलासाठी भूसंपादन झाले असून त्याच्या पुनर्वसनाची मंजूरी देण्यासाठी सरकार उशीर का करित आहे. असा सवाल देखील उपस्थित केला. यावर विभागाच्या अधिकाºयांनी किन्हीमधील भूसंपादनाची प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून लवकरच तीन्ही गावांच्या पुनर्वसन पॅकेजला मंजूरी करीता शासनाकडे सादर केले जाणार असल्याचे सांगीतले. तर मदत व पुनर्वसन सचिव गाडगीळ यांनी, विषयांचे गाभीर्य लक्षात घेत येत्या एक महिन्यात तिन्ही गावांच्या पुनर्वसनाला मंजूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच येत्या १५ दिवसांत विभागाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक घेण्याचे निर्देश विभागातील अधिकाºयांना दिले. आमदार अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Web Title:  Approved the rehab package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.