शेतकरी हितासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 09:15 PM2018-08-23T21:15:48+5:302018-08-23T21:16:18+5:30

देशात ६० टक्के लोक शेती व पशुपालन व्यवसाय करतात. पण त्यातून मिळणारे आर्थिक उत्पादन फक्त २३ टक्के एवढेच आहे. एवढी बिकट परिस्थिती असताना सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे पाऊल उलचत नाही.

Apply Swaminathan Commission for farmers' welfare | शेतकरी हितासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा

शेतकरी हितासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा

Next
ठळक मुद्देनाना पटोले : हिराटोला येथील शेतकरी कृषी संमेलन उत्साहात, शेतकऱ्यांचा केला गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : देशात ६० टक्के लोक शेती व पशुपालन व्यवसाय करतात. पण त्यातून मिळणारे आर्थिक उत्पादन फक्त २३ टक्के एवढेच आहे. एवढी बिकट परिस्थिती असताना सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे पाऊल उलचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितार्थ स्वामीनाथन आयोग लागू करा, अशी मागणी माजी खासदार नाना पटोले यांनी केली.
तालुक्यातील ग्राम हिराटोला येथील मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या दशकोत्सव स्थापना दिन महोत्सवांतर्गत सोमवारी (दि.२०) आयोजीत शेतकरी कृषी सम्मेलनात ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार दिलीप बन्सोड, राष्ट्रवादी कॉँगे्रस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, प्रभाकर दोनोडे, डॉ. अविनाश काशिवार, लोकपाल गहाणे, केवल बघेले, अमर वऱ्हाडे, संजय टेंंभरे, विनोद हरिणखेडे, जयप्रकाश भवसागर, यादोराव डोंगरे, बाबूलाल डोंगरे व सूर्यकांत डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.
पटोले म्हणाले, आपल्या ज्या शेतकऱ्यांनी संसदेत पाठविले, ज्या ओबीसी बांधवांचे प्रतिनिधीत्व करीत असताना त्यांच्या प्रश्नांचे निराकरण आपण करण्यास सरकारकडून होत नव्हते. त्यामुळेच मी खासदारकीचा राजीनामा दिला.
पशुपालन व दुग्ध व्यवसायावर चालणारी सरकारची कोंडी व दुधाला मिळत असलेला अत्यल्प भाव, भंडारा-गोंदिया येथील शेतकऱ्यांची काय अवस्था झाली. कर्जमाफी व पीक विम्याची रक्कम सुद्धा पुरेपूर शेतकऱ्यांना मिळाली नाही. तसेच येत्या काळात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकºयांच्या हितातेच पाऊल उचलून परिपूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी घेतला. तर खासदार कुकडे व माजी आमदार बंसोड यांनी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या अनेक समस्यांवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक संस्थेचे सचिव कैलाश डोंगरे यांनी मांडत्ले. कृषी महाविद्यालय उभारतांनी जे संघर्ष करावे लागले व विरोधातून जिद्द व चिकाटीला कसे बळ येते याची प्रतिची त्यांनी सांगितली. संचालन शैलेष डोंगरे यांनी केले. आभार प्राचार्य व्ही.एम. नंदेश्वर यांनी मानले. या वेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी व शेतकरी नृत्य सादर केले.
प्रगतीशील शेतकऱ्यांचा गौरव
संमेलनात शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी विविध पीक व त्यावर येणाºया किड आणि रोगाचे नियंत्रण कसे करावे यावर चित्रफितीद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी नंदकिशोर गहाणे (कोसबी), राजूजी चव्हाण (भुसारीटोला), देवाजी बनकर (कोदामेडी), वासुदेव चव्हाण (खुर्शीपार) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवान्वित आले. भाजीपाला पिकांना मिळणारा बाजारभाव आणि मार्केटिंगची पद्धत व व्यापार कसा करावा याबद्दलच्या सोयी सुविधा जिल्ह्यात कशा पूर्ण करता येणार यासाठी शेतकºयांच्या हितासाठी कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Apply Swaminathan Commission for farmers' welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.