बोनस वाटपासाठी मिळाले ५९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:36 PM2019-03-12T23:36:03+5:302019-03-12T23:37:16+5:30

सातत्याने नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या धान उत्पादकांना दिलासा म्हणून यंदा शासनाने बोनस जाहीर केला. त्यानुसार, जिल्ह्यातील धान उत्पादकांना बोनस वाटपासाठी ५९ कोटी रूपये प्राप्त झाले आहेत.

55 crore for bonus allocation | बोनस वाटपासाठी मिळाले ५९ कोटी

बोनस वाटपासाठी मिळाले ५९ कोटी

Next
ठळक मुद्देधान उत्पादकांना दिलासा : मार्केटिंग फेडरेशनकडून प्रक्रिया सुरू

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सातत्याने नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या धान उत्पादकांना दिलासा म्हणून यंदा शासनाने बोनस जाहीर केला. त्यानुसार, जिल्ह्यातील धान उत्पादकांना बोनस वाटपासाठी ५९ कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. यंदा जिल्हा मार्केटींग फेडरेशनने जिल्ह्यातील ४५ हजार १५४ शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली असून त्यांच्या खात्यात आॅनलाईन रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
निसर्गाच्या बदलाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यात मागील २-३ वर्षांपासून पाऊस दगा देत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विशेष म्हणजे, धान उत्पादकांच्या तोंडचा घासही हिरावल्याची स्थिती राज्यात निर्माण झाली होती. यंदाही पाऊस पाहिजे त्या प्रमाणात कमीच पडला मात्र वेळी साथ दिल्याने धान उत्पादकांचे फावले. परिणामी, जिल्ह्यातील धान उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र कर्जाच्या ओझ्याखाली धान उत्पादक दबूनच आहे. अशात स्थितीत धान उत्पादकांना दिलासा म्हणून राज्य शासनाने बोनस जाहीर केला. ५०० रूपये प्र्रती क्विंटल प्रमाणे ५० क्विंटलची मर्यादा ठरवून राज्यातील धान उत्पादकांना बोनस जाहीर करण्यात आला आहे.
त्यानुसार, शासनाकडून मार्केटींग फेडरेशनला बोनस वाटपासाठी ५९ कोटी रूपये मिळाले आहे. मार्केटींग फेडरेशननने यंदा ४५ हजार १५४ शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली आहे.त्यामुळे या शेतकऱ्यांना बोनस वाटप करावयाचे असून फेडरेशनकडून शेतकऱ्यांच्या खात्यात आॅनलाईन रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: 55 crore for bonus allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी