चोरी गेलेल्या २० मोटारसायकल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 09:47 PM2019-03-15T21:47:30+5:302019-03-15T21:48:09+5:30

गोंदिया जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या आठ सदस्यांकडून चोरीच्या २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.ही कारवाई १० मार्चला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.याप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलची किंमत ९ लाख ६५ हजार रूपये आहे.

20 motorcycle seized stolen | चोरी गेलेल्या २० मोटारसायकल जप्त

चोरी गेलेल्या २० मोटारसायकल जप्त

Next
ठळक मुद्देएलसीबीची कारवाई : आठ जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या आठ सदस्यांकडून चोरीच्या २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.ही कारवाई १० मार्चला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.याप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलची किंमत ९ लाख ६५ हजार रूपये आहे.
मागील काही दिवसांपासून गोंदिया शहरासह गोंदिया जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. मोटारसायकल चोरीच्या प्रकारावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांनी विशेष पथक स्थापन केले. गोंदिया शहरात होणाऱ्या मोटारसायकलच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तपासून त्या गुन्हेगारांपर्यंत पोहचण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मजीतपूर परिसरात काही संशयीतांना १० मार्चला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या चौकशीत त्यांनी रामनगरातून चोरी केलेल्या मोटारसायकलची माहिती दिली. रामनगर पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्र. १६४/२०१९ चे कलम ३७९ तसेच रावणवाडी पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्र.२९/२०१९ चे कलम ३७९ या दोन मोटारसायकलची माहिती दिली. याप्रकरणात आरोपींना अटक करून त्यांचा पीसीआर घेतल्यावर गोंदिया जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९ लाख ६५ हजार रूपये किंमतीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणात आणखी आरोपी अडकण्याची शक्यता आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक संदीप भोपळे, पोलीस कर्मचारी गोपाल कापगते, विजय रहांगडाले, चंद्रकांत कर्पे, राजकुमार पाचे, मधुकर कृपाण, चित्तरंजन कोडापे, भुवनलाल देशमुख, भुमेश्वर जगनाडे, तुलसीदास लुटे, विनय शेंडे, नेवालाल भेलावे, चालक पोलीस शिपाई मुरली पांडे, पंकज खरबडे, विनोद गौतम, रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोल सोनवने, प्रशांत माने यांनी केली.

वाहन मालकांनी करावी पोलिसात तक्रार
ज्यांचे वाहन चोरीला गेले असेल त्या वाहन चालकांनी आपल्या वाहनासंबधी तक्रार संबधीत पोलिस ठाण्यात करावी.मिळालेल्या वाहनात त्यांचे वाहन होऊ शकते याची खात्री पोलिसांकडून करून घ्यावी. चोरीचे वाहन खरेदी करू नये किंवा वापरू नये, कुणी चोरीचे वाहन वापरत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे पोलिसांनी कळविले आहे.
मोटारसायकल चोरीत या आरोपींना केली अटक
२० मोटारसायकल जप्त करून आठ आरोपींना एलसीबीने अटक केली. त्या आरोपींमध्ये शिवम संतोष खरोले (१९) रा. मजीतपूर, शुभम रमेश पटले (२०) रा. मजीतपूर, सलाम रफीक शेख (२०) रा. रेल्वे चौकीजवळ गंगाझरी, राहूल रविंद्र मस्करे (२०) रा. गंगाझरी, राकेश रामदास मडावी (२७) रा. गंगाझरी, प्रवीण उर्फ छोटू गणेश बिसेन (२५) रा.वॉर्ड नं.१ रेल्वे चौकीजवळ गंगाझरी, जितेंद्र सेवकराम साकोरे (२२) रा. मजीतपूर,गणेश प्रल्हाद मेश्राम (२०) रा. गंगाझरी यांचा समावेश आहे.

Web Title: 20 motorcycle seized stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.