१४६ गावातील गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 09:55 PM2019-04-16T21:55:45+5:302019-04-16T21:56:15+5:30

जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून जिल्ह्यातील १४६ गाव आणि वाड्यातील गावकऱ्यांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

146 villagers wander the water of the villagers | १४६ गावातील गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

१४६ गावातील गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

Next
ठळक मुद्देउपाययोजनांकडे दुर्लक्ष : ४ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून जिल्ह्यातील १४६ गाव आणि वाड्यातील गावकऱ्यांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मात्र जिल्हा प्रशासनातर्फे अद्यापही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने गावकºयांमध्ये रोष व्याप्त आहे.
जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडतो. मात्र मागील वर्षीे केवळ सरासरीच्या ९३० मि.मी.पावसाची नोंद झाली. यावर्षी तापमानातही प्रचंड वाढ झाली असल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर होत आहे. भूजल सर्वेक्षण व जि.प.पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यात केलेल्या तीसºया टप्प्याच्या सर्वेक्षणात भूजल पातळीत एक ते दीड मीटरने घट झाली असल्याचे आढळले.
परिणामी विहिरी आणि बोअरवेलची पाण्याची पातळी अंत्यत खोल गेली आहे. तर काही गावातील विहिरी आणि बोअरवेल सुध्दा कोरड्या पडल्याने गावातील महिलांना सकाळपासूनच पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तर काही गावातील बोअरवेल आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची भल्या पहाटेपासूनच गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
जि.प.पाणी पुरवठा विभागाने एप्रिल ते जून महिन्या दरम्यानचा एकूण ३९८ गावांचा पाणी टंचाईचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार १२६ गावे आणि २६ वाड्यांमध्ये सध्या पाणी टंचाईची स्थिती गंभीर आहे.
या गावांमधील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ९३ लाख रुपयांच्या विविध उपाय योजनांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यात १३६ नवीन बोअरवेलचे खोदकाम, ३६ गावातील नळ योजनांची दुरूस्ती, ९६२ बोअरवेलची दुरूस्ती, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी १९ गावातील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन केले आहे. पाणी टंचाई निवारणार्थ एकूण १५४० उपाय योजना राबविण्यात येणार आहे. मात्र अद्यापही या उपाय योजना राबविण्यास जि.प.पाणी पुरवठा विभागाने सुरूवात केली नाही. त्यामुळे गावकºयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
उपाययोजना कागदावरच
जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून पाणी टंचाईची स्थिती गंभीर आहे. तर दुसरीकडे जि.प.पाणी पुरवठा विभाग टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना सुरू केल्याचा दावा करीत आहे.मात्र गावकºयांची पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याने प्रशासनाच्या उपाययोजना केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे.
चार दिवसानंतर सोडणार पाणी
गोंदिया शहरवासीयांची पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सोमवारी (दि.१५) महाराष्टÑ जीवन प्राधिकरण आणि सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाची पाहणी केली. त्यानंतर चार दिवसांनी पुजारीटोला धरणाचे पाणी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत सोडले जाणार आहे.
पाच कोटी रुपयांची तरतूद पण खर्च किती?
जिल्हा प्रशासनाने यंदा जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ४ कोटी ९३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र अद्यापही बºयाच गावांमधील बोअरवेल आणि नळ योजना बंद पडल्या आहे. त्यामुळे तरतूद केलेल्या निधीपैकी नेमका किती निधी आतापर्यंत खर्च करण्यात आला याची माहिती मात्र या विभागाकडे नाही.
ग्रामीण भागासह शहरवासीयांवर संकट
जिल्ह्यातील केवळ ग्रामीण भागावरच पाणी टंचाईचे संकट नसून गोंदिया शहरावर सुध्दा पाणी टंचाईचे संकट कायम आहे. गोंदिया शहराला पाणी पुरवठा करणाºया डांगोर्ली येथील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून केवळ चार दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे चार दिवसानंतर शहरवासीयांना सुध्दा पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

Web Title: 146 villagers wander the water of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.