कचरा व्यवस्थापन मंत्रलयास न्याय देईन, मायकल लोबो यांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 09:03 PM2019-07-13T21:03:04+5:302019-07-13T21:03:43+5:30

घन कचरा व्यवस्थापन खाते तथा मंत्रलय जर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्थापन केले तर आपण त्या खात्याला न्याय देईन, असे मंत्रीपदाची शपथ स्वीकारलेले कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले.

will give justice to the Waste management ministry, Michael Lobo's assurance | कचरा व्यवस्थापन मंत्रलयास न्याय देईन, मायकल लोबो यांचे आश्वासन 

कचरा व्यवस्थापन मंत्रलयास न्याय देईन, मायकल लोबो यांचे आश्वासन 

googlenewsNext

पणजी - घन कचरा व्यवस्थापन खाते तथा मंत्रलय जर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्थापन केले तर आपण त्या खात्याला न्याय देईन, असे मंत्रीपदाची शपथ स्वीकारलेले कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले.

कळंगुट- साळगावच्या पठारावर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा रहावा म्हणून लोबो यांनी यापूर्वी मोठे योगदान दिले आहे. मनोहर र्पीकर मुख्यमंत्रीपदी असताना र्पीकर यांनी लोबो यांना सोबत घेऊन तो प्रकल्प उभा केला. लोबो म्हणाले, की आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. बायंगिणीलाही आपण कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करून दाखवीन. गोव्याच्या अन्य भागांतीलही कचरा प्रश्न आपण सोडवीन. मात्र त्यासाठी आपल्याकडे घन कचरा व्यवस्थापन खाते मुख्यमंत्र्यांनी द्यावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी अशा खात्याची स्थापना करावी. खाते स्थापन करणो शक्य आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याशी चर्चा केल्यानंतर कायदेशीर सल्लामसलतरही सुरू केली आहे. 

लोबो म्हणाले, की कळंगुट मतदारसंघातील कचराप्रश्न आपण सोडवला. आम्ही कचरा व्यवस्थापन महामंडळाचे काम पाहिले आहे. आम्ही त्या कामात सहभागी झालेलो आहोत. किनारपट्टीतील कचरा गोळा करून तो कळंगुटच्या प्रकल्पात आणला जातो. कचरा समस्या ही राज्यभर खूप मोठी आहे. या समस्येवर कायमस्वरुपी उपाय मी काढीन. त्यासाठी कचरा व्यवस्थापन खाते मुख्यमंत्र्यांनी स्थापन करावे व ते आपल्याकडे सोपवावे. 

ते विधान अशोभनीय 
विजय सरदेसाई यांनी केलेल्या टीकेला लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री सावंत यांना गोंयकारपण हा शब्द देखील उच्चरता येत नाही असे सरदेसाई यांनी म्हणणो हे अत्यंत गैर आहे. सरदेसाई यांची विधाने म्हणजे दादागिरीची भाषा आहे. त्यांना मंत्रीपद का गमवावे लागले याबाबत त्यांनी अंतमरुख होऊन विचार करावा. सरदेसाई यांनी स्वत:ला वॉचडॉग म्हणून घेऊ नये. त्यांना तो नैतिक अधिकारही नाही. र्पीकर यांच्या समाधीस्थळाचा सरदेसाई यांनी दुरुपयोग केला आहे. राजकीय कारणास्तव दुरुपयोग केला. मुख्यमंत्री सावंत यांना गोव्याविषयी प्रेम आहे व विद्यमान सरकार हे गोंयकारपण राखणारे सरकार आहे, असे लोबो म्हणाले.

Web Title: will give justice to the Waste management ministry, Michael Lobo's assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा