गोव्यात देशीपेक्षा विदेशी पर्यटकांना का पसंती दिली जाते?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 04:03 PM2018-01-04T16:03:10+5:302018-01-04T16:03:25+5:30

गोव्याला विदेशी नागरिक पर्यटक म्हणून हवे आहेत आणि अधिक खर्च करणाºया देशी पर्यटकांपेक्षा त्यांनाच येथे पसंती का दिली जाते हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अशा काही लोकप्रिय किना-यांना भेट दिलीच पाहिजे

Why are foreign tourists preferred indigenous people in Goa? | गोव्यात देशीपेक्षा विदेशी पर्यटकांना का पसंती दिली जाते?

गोव्यात देशीपेक्षा विदेशी पर्यटकांना का पसंती दिली जाते?

googlenewsNext

राजू नायक
हरमल ( उत्तर गोवा) - गोव्याला विदेशी नागरिक पर्यटक म्हणून हवे आहेत आणि अधिक खर्च करणाºया देशी पर्यटकांपेक्षा त्यांनाच येथे पसंती का दिली जाते हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अशा काही लोकप्रिय किना-यांना भेट दिलीच पाहिजे. गोव्यात उत्तर गोव्यातील कळंगूट, कांदोळी समुद्रकिनारे जास्त लोकप्रिय आहेत. कळंगूटला तर हमखास गर्दी असते. गोव्यात येणारा कोणताही पर्यटक कळंगूटला भेट दिल्याशिवाय आपले पर्यटन पूर्ण झाले असे मानत नाही.

मांदे्र, हरमल असे काही किनारे आहेत जे रशीयन, इस्त्रायली पर्यटकांनी आपले माहेरघर बनविले आहे. येथे त्यांच्या वास्तव्यांनी वेगळीच जीवनशैली निर्माण झालेली आहे. या किना-यावर ड्रग्ज मिळतात, रशीयन माफीया वाास्तव्य करतो अशी टीका होत असली तरी वेगळ््या जीवनशैलीमुळे या किनाºयांवर जोश आणि उत्साहाचे भरतेही आलेले असते. कारण संध्याकाळ पडू लागल्यानंतर विदेशींचे जथेच किना-यावर जमू लागतात. कोणी ड्रम्स आणतो, कोणी गीटार, सीतार आणि पाश्चात्य तालवाद्यांचे सूर उमटू लागतात आणि त्यावर पाय आपोआप थिरकू लागतात. शेवटी शेकडो लोकांचा मिळून किनारी नाच सुरु होतो. त्यातून क्वचित एक वेगळे संगीत नृत्यही जन्माला येते.

स्थानिक सांगतात विदेशी लोक कचरा करत नाहीत. त्यांनी आपल्या जीवनशैलीने या किना-यावर जान आणली आहे. १९७० च्या दशकात येथे हिप्पी येऊ लागले. त्यानंत २००० साली त्यांच्यावर निर्बंध आले. त्यांच्या रेव्ह पार्ट्यांनी किना-यांना ग्रहणही लागले. परंतु आता स्वच्छंदी विदेशी पर्यटक आत्मशोधासाठी नवी यात्रा सुरु करताना दिसतो. तो स्वत:चा शोध घेताना कधी ध्यानाला बसतो कधी निवांत पडून राहतो तर कधी तलावात तरंगताना रममाण होतो.

येथे बरेचजण निवांतपणाच्या शोधात कायमची त्याठिकाणातीच झाली आहेत. त्यामुळे त्यांची मुले कोकणी बोलतात, स्थानिक शाळांमध्ये जातात. स्थानिकांचा त्यांना उपद्रव होत नाही. कधी-कधी देशी पर्यटक मात्र त्यांना त्रास देतात. त्यांची छायाचित्रे घेतात. लमाणी त्यांना वस्तू विकण्याच्या बहाण्याने सतावतात. स्थानिकांना जरी देशी पर्यटकांकडून पैसे खूप मिळत असले तरी ते खरी पसंती देतात ते अशा विदेशी पर्यटकांनाच. विदेशी पर्यटकांमुळेच हे किनारे ताजे, टवटवीत होतात असा सूर स्थानिक लोकांकडून ऐकायला मिळतो.




दादा

सोपानदादा गेले. पत्रकार असो अथवा अन्य कोणी, तो तसा का वागतोय याचे पडद्याआडचे जळजळीत वास्तव विलक्षण मिश्कीलतेने, समजुतीने ते सांगायचे. कोणाचे घोंगडे कसे, कोठे आणि का अडकलेय ते नजाकतीने उलगडायचे. सर्व घटनांकडे तटस्थतेने आणि विनोदाने पाहायला त्यांना खूप भारी जमायचे. त्यामुळेच असेल कदाचित पत्रकारितेत राहूनही निगर्वी राहिलेले.
राजकारणासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या मांदियाळीत वावरून साधेपणा जपलेला. ते सर्वांशी विलक्षण आपुलकीने वागत. तल्लख विनोद बुद्धी, प्रचंड सकारात्मकता, हजरजबाबीपणा आदींची त्यांची शिदोरी मोठी होती. पत्रकारितेतील नवख्या मुलापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांशी वागण्याची एकच तºहा. या गुणामुळेच त्यांची सर्वांशी दोस्ती. सर्वांना मदत करायचे आणि तेही श्रेय न घेता.
पहिल्या वाक्यातच असा पंच मारायचे की समोरच्याला हसू फुटणारच. कार्यालयीन ताणतणावाच्या काळात सहकाºयांना दादांनी दिलेला आपुलकीचा धीर आठवला की रडायला येते. सतत हसतमुख. त्यांना काही एक शारीरिक त्रास झालेला, शस्त्रक्रियाही झालेली. त्यातून ते परतले, पुन्हा कामावर रुजूही झालेले. खूप वर्षे काम करत राहिले.
खूप वर्षे बातमीदार म्हणून काम केल्यानंतर अचानक एक दिवासापासून ते डेस्कला रुजू झाले. आणि आमचा सहवास वाढला. स्वत:च्या मरणावरही कैकवेळा ते विनोद करायचे. दादांची मैफल अगदी चहाची असो अथवा तीर्थपानाची हसू खळाळून उधळले नाही, असे होतच नसे. निवृत्तीला काही वर्षे राहिली असताना कंपनीत सर्वत्र संगणकीकरण सुरू झालेले. दररोज सकाळी आठ वाजता बिंदू चौकात संगणक शिकण्यासाठी कंपनीतर्फे पाठवले जाई. सर्वात आधी संगणकावर बातमी गतीने आॅपरेट करायला शिकले ते सोपानदादा. आज त्यांची बातमी ऐकावी लागली आणि संगणकावर गतीने काम करणारे दादा आठवले. दादा आज मात्र रडवलेत.






‘दांडेकर’ पोलीस काय कामाचे? कु ल शब्द(343)
 

 

 

Web Title: Why are foreign tourists preferred indigenous people in Goa?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा