शिवोली रस्ता रुंदीकरणप्रकरणी मायकल लोबोंची वन खात्याकडून जबानी नोंद

By पूजा प्रभूगावकर | Published: April 12, 2024 05:25 PM2024-04-12T17:25:53+5:302024-04-12T17:26:33+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनांनुसार त्यांनी ही जबानी नोंद केली आहे.

verbal note from forest department of michael lobo regarding widening of shivoli road | शिवोली रस्ता रुंदीकरणप्रकरणी मायकल लोबोंची वन खात्याकडून जबानी नोंद

शिवोली रस्ता रुंदीकरणप्रकरणी मायकल लोबोंची वन खात्याकडून जबानी नोंद

पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: शिवोली रस्ता रुंदीकरणासाठी बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल केल्याप्रकरणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांची शुक्रवारी कांपाल पणजी येथील वन खात्याने जबानी नोंद केली.

लोबो वन खात्याच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसात सकाळी उपस्थित राहिले होते. जबानी नोंद करण्यासाठी एक तासाहून अधिकवेळ लागला. मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनांनुसार त्यांनी ही जबानी नोंद केली आहे. कळंगुट ते शिवोली या मार्गावरील झाडांची कत्तल बेकायदेशीरपणे झाल्याचा आरोप होत आहे. सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे.

शिवोली रस्ता रुंदीकरण बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल याचिकेवर उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी झाडांची कत्तल करण्यासाठी आपण कुणालाही कुठलेही निर्देश दिलेले नाही. आपला जो व्हिडिओ याचिकादाराने सादर केला आहे, त्याचा या प्रकरणाची कुठलाही संबंध नसल्याचे लोबो यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Web Title: verbal note from forest department of michael lobo regarding widening of shivoli road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.