गोव्यात सार्वजनिक जागी दारू पिणा-या पर्यटकांविरुद्ध उपाय करू : मनोहर पर्रिकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 06:44 PM2018-01-03T18:44:47+5:302018-01-03T18:44:50+5:30

सार्वजनिक जागी, अगदी उघडय़ावर जे पर्यटक मद्य पितात किंवा अती मद्यसेवन करतात, त्यांच्याविरुद्ध योग्य ती उपाययोजना केली जाईल.

Take action against tourists visiting public in Goa: Manohar Parrikar | गोव्यात सार्वजनिक जागी दारू पिणा-या पर्यटकांविरुद्ध उपाय करू : मनोहर पर्रिकर

गोव्यात सार्वजनिक जागी दारू पिणा-या पर्यटकांविरुद्ध उपाय करू : मनोहर पर्रिकर

Next

पणजी : सार्वजनिक जागी, अगदी उघडय़ावर जे पर्यटक मद्य पितात किंवा अती मद्यसेवन करतात, त्यांच्याविरुद्ध योग्य ती उपाययोजना केली जाईल. सार्वजनिक जागी स्वयंपाक करणा:या पर्यटकांबाबतही योग्य तो विचार सरकार करील. राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून अर्थसंकल्पाद्वारे पर्यटकांशीनिगडीत काही समस्यांवर योग्य ते उत्तर मिळेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले.

र्पीकर म्हणाले, की पर्यटकांनी उघडय़ावर दारू पित बसू नये असे अपेक्षित आहे. अति मद्य सेवन केल्यानेही समस्या निर्माण होतात. भिका:यांचा देखील प्रश्न गोव्याला सतावतो. म्हापसा येथे भिका:यांना ठेवण्यासाठी  डिटेन्शन सेंटर तयार केले जाईल. म्हापशात त्यासाठी जागा उपलब्ध आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले, की रिकाम्या बाटल्या वगैरे पर्यटकांनी कुठेही टाकल्या तरी, त्या लगेच सरकारी यंत्रणोकडून उचलल्या जातात. त्यामुळे पूर्वीसारखा कचरा आता दिसत नाही. कुठेही बाटल्यांचे खच पूर्वी दिसत होते, तशी आता स्थिती नाही. साळगावच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये रोज 5क् ते 6क् टन कचरा येत आहे. जास्त खर्च करू शकत नाहीत असे पर्यटक देखील गोव्यात येत असतात. ते सार्वजनिक ठिकाणी किंवा मिळेल तिथे कुठेही स्वयंपाक करतात हे खरे असले तरी, अशा पर्यटकांनाही आम्ही योग्य तो पर्याय अगोदर द्यायला हवा. त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा न्ििश्चत करायला हव्यात. सरकारने हा विषय विचारात घेतला आहे. सरकार त्याबाबतची तयारी करत आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात सादर होणा:या अर्थसंकल्पातही त्याविषयीचे भाष्य केले जाईल. थोडा दिलासा लोकांना दिला जाईल.

मुख्यमंत्री म्हणाले, की कमी खर्च करणा:या किंवा उघडय़ावर स्वयंपाक करणा:या पर्यटकांना गोव्यात येण्यापासून कुणी अडवू शकत नाही. देशात कुठेच तसा कायदा नाही. मद्य पिऊन कुणी वाहन चालवू नये म्हणून उपाय योजले जात आहेत. यापूर्वी पब मालक आणि अन्य व्यवसायिकांना सूचना करण्यात आल्या आहेत. जर कुणी जास्त दारू प्यालेला असेल तर त्याला वाहन चालविण्यासाठी वाहनात बसण्यास देऊ नका, अशी सूचना सरकारने केली आहे. अधूनमधून तपासणी केली जाते. 

Web Title: Take action against tourists visiting public in Goa: Manohar Parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.