शशिकला काकोडकर अनंतात विलीन

By admin | Published: October 29, 2016 06:14 PM2016-10-29T18:14:00+5:302016-10-29T21:56:56+5:30

माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांना गोमंतकीयानी साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला.

Shashikala Kakodkar merged with Ananta | शशिकला काकोडकर अनंतात विलीन

शशिकला काकोडकर अनंतात विलीन

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
पणजी, दि. २९ - माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर शनिवारी अनंतात विलीन झाल्या. सांतइनेज येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात शशिकलाताईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले व गोमंतकीयांनी साश्रूनयनांनी काकोडकर यांना अखेरचा निरोप दिला. ताईंच्या जाण्याने एक पर्व संपले अशीच प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरांवरील मान्यवरांनी व्यक्त केली.
 
गोव्याच्या आतार्पयतच्या एकमेव महिला मुख्यमंत्री ठरलेल्या काकोडकर यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले होते. आल्तिनो येथील त्यांच्या निवासस्थानीच त्यांची प्राणज्योत मालवली. तथापि, शुक्रवारी दुपारनंतर त्यांचे शव बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळातील  शवागारात नेऊन ठेवण्यात आले. शनिवारी सकाळी अकरा वाजता शव आल्तिनो येथील निवासस्थानी आणले गेले. त्यानंतर दिवसभर गोव्याच्या कानाकोप:यातील लोकांनी आल्तिनो येथे येऊन काकोडकर यांचे अंत्यदर्शन घेतले. 
 
संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, मंत्री सुदिन ढवळीकर, दिपक ढवळीकर, अॅलिना साल्ढाणा, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणो, आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर, आमदार राजन नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईङिान फालेरो, म.गो.चे आमदार लवू मामलेदार, भाजपचे खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी मंत्री अॅड. दयानंद नाव्रेकर, उद्योगपती दत्तराज साळगावकर, श्रीनिवास धेंपे, दिनार तारकर, विक्टर आल्बुकेर्क,  भाषा सुरक्षा मंचचे प्रा. सुभाष वेलिंगकर, माजी खासदार एदुआर्द फालेरो, सभापती अनंत शेट, माजी मंत्री चर्चिल आलेमाव, आमदार पांडुरंग मडकईकर, नरेश सावळ, विजय सरदेसाई, विश्वजित राणो आदींनी काकोडकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर र्पीकर, रवी नाईक, सुदिन ढवळीकर, फ्रान्सिस सार्दिन, अॅड. रमाकांत खलप, सुभाष वेलिंगकर, अॅड. उदय भेंब्रे, आनंद शिरोडकर, राजू सुकेरकर आदी सांतइनेज येथील स्मशानभूमीतही उपस्थित राहिले. 
 
काकोडकर यांचे ज्येष्ठ पुत्र यतिन काकोडकर यांनी मंत्रग्नी दिला. शशिकलाताईंचे अन्य दोन पुत्र व इतर कुटूंबिय यावेळी उपस्थित होते. स्मशानभूमीत एकवीस फैरी झाडून सलामी देण्यात आली. तत्पूर्वी आल्तिनो येथून प्रेतयात्र शहरात आणण्यात आली. शशिकलाताई अमर रहे अशा घोषणाही देण्यात आल्या. महालक्ष्मी मंदीराकडील सिद्धार्थ भवन येथे काही मिनिटे प्रेतयात्र थांबली. तिथून यात्र स्मशानभूमीत आणण्यात आली.

Web Title: Shashikala Kakodkar merged with Ananta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.