मुख्यमंत्र्यांचे नाव सांगून अधिका-यांना धमकावले, गोव्यात भाजप नेत्यावर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 10:28 PM2018-01-14T22:28:23+5:302018-01-15T15:26:38+5:30

बेकायदेशीर सुरू असलेले उत्खनन बंद  पाडायला गेलेल्या भरारी पथकाला आपण मुख्यमंत्र्यांचा माणूस असल्याचे सांगून अडविण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भाजप नेते हेमंत होलतकर यांच्याविरुद्ध जुने गोवा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Reporting the name of Chief Minister threatens the officers, crime in the BJP leader in Goa | मुख्यमंत्र्यांचे नाव सांगून अधिका-यांना धमकावले, गोव्यात भाजप नेत्यावर गुन्हा 

मुख्यमंत्र्यांचे नाव सांगून अधिका-यांना धमकावले, गोव्यात भाजप नेत्यावर गुन्हा 

Next

पणजी - बेकायदेशीर सुरू असलेले उत्खनन बंद  पाडायला गेलेल्या भरारी पथकाला आपण मुख्यमंत्र्यांचा माणूस असल्याचे सांगून अडविण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भाजप नेते हेमंत होलतकर यांच्याविरुद्ध जुने गोवा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सरकारी नोकरावर हल्ला करण्याच्या प्रकरणात आल्याचे नगर नियोजन खात्याकडून नोंदविण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 
जुने गोवा मेरशी येथील कदंब पठारावर बेकायदेशीरपणे उतखनन सुरू असल्याची तक्रार भरारी पथकाला आल्यामुळे त्वरित या पथकाने घटना स्थळावर धाव घेतली. तसेच नगर नियोजन खात्याचे कर्मचारीही त्या ठिकाणी धावले. परंतु लतकर यांनी त्यांना तेथे जाऊन अडविले आणि  तिथे बेकायदेशीर उत्खननाचे सर्व्हेक्षण करणा-या कर्मचा-यांना काम करू दिले नाही. तसेच त्यांना धक्काबुक्की केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.  हे उत्खनन बेकायदेशीर असल्याचे कर्मचा-यांनी सांगितल्यानंतर गोलतकर यांंनी हे काम मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तोंडी आदेशावरून सुरू असल्याचे त्यांना सांगितले. परंतु त्याचा भरारी पथकावर काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी उत्खनन बंद पाडले आणि पोलिसांच्या सहाय्याने ६ ट्रक आणि एक जेसीबी मशीनरी जप्त केली. 
या प्रकरणात नगर नियोजन खात्याच्या कर्मचाºयांनी जुने गोवा पोलीस स्थानकात जाऊन हेमंत होलतकर यांच्या विरद्ध तक्रार नोंदविली  आणि पोलिसांनी  भारतीय दंडसंहिता कलम ३५५, ५०५ आणि ५०६ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासही सुरू केला अशी माहिती जुने गोवा पोलिसांकडून देण्यात आली.

Web Title: Reporting the name of Chief Minister threatens the officers, crime in the BJP leader in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.