गोव्यात ७00 मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 07:59 PM2017-09-20T19:59:43+5:302017-09-20T20:00:03+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे गोव्यातील शहरांमधील एकूण १00 मद्यालये बंद झाली होती. त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण गेल्या मार्च-एप्रिलमध्ये अबकारी खात्याने करून दिले नव्हते. आता रोज सरासरी १00 परवान्यांचे नूतनीकरण होत आहे. आतापर्यंत ७00 परवान्यांचे आतापर्यंत नूतनीकरण झाले आहे.

Renewal of licenses for 700 idols in Goa | गोव्यात ७00 मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण

गोव्यात ७00 मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण

googlenewsNext

पणजी : राज्यातील पालिका क्षेत्रांमधील तथा शहरांमधील महामार्गांच्या बाजूने असलेल्या मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया अबकारी खात्याने सुरू केली आहे. सुमारे ७00 मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत क्षेत्रांमधील मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण अजून झालेले नाही. पंचायत क्षेत्रांमध्ये 'अ‍ॅप्रोचेबल रोड' पद्धतीने अबकारी खाते नव्याने सर्वेक्षण करणार आहे. त्यासाठी खात्याने अधिकाºयांचे पथक स्थापन केले आहे. शहरांमधील मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे काम पूर्णपणे संपुष्टात आल्यानंतर मग सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. पंचायत क्षेत्रांमधील रस्त्यांच्या बाजूचे अंतर नव्याने मोजले जाणार आहे. सध्या सर्व तालुक्यांमधील अबकारी खात्याच्या कार्यालयांकडून शहरांमधील मद्यालये व दारू दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले जात आहे.
 

Web Title: Renewal of licenses for 700 idols in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.