गोव्यातही वाढत आहे स्वादुपिंडाचा कर्करोग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 08:30 PM2018-03-25T20:30:00+5:302018-03-25T20:30:00+5:30

Pancreas is also growing in Goa | गोव्यातही वाढत आहे स्वादुपिंडाचा कर्करोग

गोव्यातही वाढत आहे स्वादुपिंडाचा कर्करोग

Next

पणजी: देशात स्वादुपिंडाचा कर्करोग वाढत असल्याचे आढळून आले आहे. हे केवळ देशातील चित्र नव्हे तर गोव्यातही अलिकडच्या काळात स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे रुग्ण अधिकाधिक आढळू लागल्याचे दिसून येत आहे. गोव्याच्या कॅन्सर रजिस्ट्रीत कर्करुग्णांची संख्या १२०० एवढी दाखविली आहे. परंतु गुपचूप उपचार घेणारे, गोव्याबाहेर जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्येचा अंदाज घेतला तर ती दीड हजार होईल. त्यातील अध्यार्हून अधिक रुग्ण हे गोमेकॉत उपचार घेत आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे २०० हून अधिक रुग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण आहेतच,  परंतु आतड्याचा कर्करोग १०० हून अधिक जणांना झालेला आढळून आला आहे. तोंडाचे व गळ्याचे १५० ते २०० रुग्ण  आहेत तर बाकीचे इतर प्रकारचे रुग्ण आहेत. अर्थात ही रजिस्ट्री ५ वर्षांपूर्वीची आहे त्यामुळे नवीन आकडे काय आहेत याची अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.
गोव्यात विविध ठिकाणी काम करणाºया कर्करोगतज्ज्ञांच्या अंदाजाप्रमाणे अलिकडील काळात या संख्येत फार फरक पडला आहे. कारण स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे रुग्णही मोठ्या प्रमाणावर अढळू लागले असल्याची माहिती कर्करोग तज्ज्ञ डॉ शेखर साळकर यांनी दिली. या रोगाची लक्षणे लवकर कळत नाहीत हीच मोठी समस्या आहे. स्वादुपिंडाचा कर्करोगाची ह्यहेड, बॉडी, टेल अशा तीन प्रकारात वर्गवारी केली जाते. हेड, बॉडी, टेल. या पैकी पहिला हेड ह्या प्रकाराची लक्षणे लवकर दिसतात. अशा प्रकारात रुग्णाला सुरूवातीला कावीळ होते. बाकी दोन प्रकारात मात्र लक्षणे लवकर दिसत नाहीत. त्यामुळे नियमीत चाचण्या हीच त्यावर खबरदारी आहे असे डॉ साळकर यांनी सांगितले. मधुमेह हा इतर अनेक रोगांना आमंत्रण देण्यास कारणीभूत जसा ठरतो तसा कर्करोगाच्या बाबतीतही तो घातकच ठरतो. परंतु अचानक वजन वाढणे तेवढेच धोकादायक मानले जाते.
गोमेकॉत कर्करोग तज्ज्ञ नसल्यामुळे प्रत्येक विभागाचे तज्ज्ञ डॉक्टरच कर्क रोगाची प्रकरणे हाताळतात. एका विभागाच्या तज्ज्ञाकडून मिळालेल्या माहितीनुसार अलिकडे स्वादुपिंडाचे कर्करोगी अधिक आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. धूम्रपान, गुटखा चघळणे आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन ही या रोगाची मुख्य कारणे आहेत. तसेच दुषित पाणी पिल्यामुळेही हा रोग होण्याची शक्यता असल्याचेही पाहाणीतून आढळून आले आहे.

Web Title: Pancreas is also growing in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.