आता पेड सेक्ससाठीही आधारकार्ड अनिवार्य  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 09:48 IST2017-12-17T09:46:08+5:302017-12-17T09:48:09+5:30

विविध सरकारी सेवांसाठी  आधार कार्ड अनिवार्य करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. बँक खात्यांपासून मोबाइल नंपर पर्यंत सर्वत्र आधार क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. आता तर चक्क पेड सेक्स करण्यासाठी आधार कार्ड...

Nowadays, Aadhaarad mandates for paid sex | आता पेड सेक्ससाठीही आधारकार्ड अनिवार्य  

आता पेड सेक्ससाठीही आधारकार्ड अनिवार्य  

पणजी - विविध सरकारी सेवांसाठी  आधार कार्ड अनिवार्य करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. बँक खात्यांपासून मोबाइल नंपर पर्यंत सर्वत्र आधार क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. आता तर चक्क पेड सेक्स करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. गोव्यात पेड सेक्सची मागणी करणाऱ्यांसाठी आधार कार्ड मागितले जात आहे. दिल्लीतून गोव्यात फिरण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांना आलेल्या अनुभवावरून ही बाब उघडकीस आली आहे. 
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील पाच तरुण गोव्यात बॅचलर पार्टीसाठी गोव्यात आले होते. तेथे त्यांनी एका दलालाशी संपर्क साधून आपल्यासाठी पाच मुलींची मागणी केली. हे पाचही तरुण उत्तर गोव्यातील एका हॉटेलमध्ये उतरले होते. येथे त्या दलालाने त्यांना फोन करून मुलींची सोय झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्या दलालाने पुन्हा फोन करून आधार कार्डची मागणी केली. 
 त्याने त्या तरुणांचे नाव, हॉटेल इत्यादी माहिती घेतली. मुलींची मागणी करणारे तरुण हे पोलिसांनी पाठवलेले माणूस तर नाहीत ना याची खबरदारी त्याला घ्यायची होती. त्यासाठीच त्या व्यक्तीने हॉटेलच्या रूमची चावी आणि आधारकार्ड व्हॉट्स अॅपवर पाठवण्यास सांगितले. जेणेकरून कोणत्याही पद्धतीने पोलिसांच्या हातून पकडले जाऊ नये, याची पुरेपूर काळजी त्याच्याकडून घेण्यात येत होती.  
या प्रकारामुळे दिल्लीतून आलेल्या या तरुणांची अवस्था काहीशी विचित्र झाली होती. मात्र तो दलाल मुली पुरवण्याआधी तरुणांच्या संपूर्ण माहितीवर अडून बसला होता. कोणताही दगाफटका होण्यापासून वाचण्यासाठी हे आवश्यक असल्याचे तो पुनपुन्हा सांगत होता. गोव्यात जोरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर लगाम घालण्यासाठी गोवा पोलीस प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच गोव्यातील एजंट आणि दलाल यांच्याकडून सावधगिरी बाळगण्यात येत आहे. 

Web Title: Nowadays, Aadhaarad mandates for paid sex